Heart Health
संध्याकाळी पाय जड आणि सूजतात का?

OPD मध्ये अनेकजण असं म्हणतात:
"Doctor, सकाळी पाय अगदी ठीक असतात, पण संध्याकाळी घोट्याजवळ सूज येते." "मोज्यांचे वळ उमटतात, चप्पल घट्ट वाटते."
काहींना दिवसभर पाय जड वाटतात आणि ते विचारतात की हा Heart की Kidney चा problem आहे का?
खरं तर प्रत्येक सूज मोठा आजार नसतो. सूज कधी येते, एका पायाला की दोन्ही पायांना येते आणि कोणत्या लक्षणांसोबत येते यावर तिचा अर्थ बदलतो.
1. सकाळी ठीक असलेले पाय संध्याकाळी सूजतात? दिवसभर उभं राहणं, खुर्चीत बसणं, लांबचा प्रवास किंवा कमी हालचाल यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे पायांच्या खालच्या भागात पाणी साचू शकतं. गरम हवामान, जास्त वजन किंवा पायांच्या शिरांमधून रक्त वर जाण्याची प्रक्रिया मंद असणं यामुळे त्रास वाढतो. रात्री आराम केल्यावर सूज कमी होणं हा महत्त्वाचा clue आहे.
2. BP, Pain किंवा Diabetes च्या medicines चालू आहेत का? Amlodipine सारख्या BP medicines मुळे घोट्याजवळ सूज येऊ शकते. काही painkillers, steroids किंवा Diabetes ची Pioglitazone medicine सुद्धा सूज वाढवू शकतात. BP normal असूनही पाय सुजतात तर medicines तपासणं महत्त्वाचं आहे. गोळी स्वतःहून बंद करू नका.
3. पाय जड होतात पण Varicose Veins आहेत का? पायांवर फुगलेल्या शिरा दिसणं, घोट्याजवळ त्वचा काळवंडणं, दिवसभर उभं राहिल्यावर जडपणा वाढणं हे Venous Insufficiency (पायातील रक्त वर परत जाण्यात अडचण) चे संकेत असू शकतात. इथे शरीरात जास्त पाणी असण्याचा प्रश्न नसतो, त्यामुळे प्रत्येक सूजेवर Diuretic गोळी हा उपाय नाही.
4. महिलांमध्ये Hormonal changes चा संबंध? Periods च्या आसपास, Pregnancy मध्ये किंवा काही hormonal medicines मुळे पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती बदलू शकते. पण Pregnancy मध्ये अचानक सूज वाढणं, तीव्र डोकेदुखी किंवा नजरेत बदल जाणवणं यासाठी तातडीने तपासणी आवश्यक आहे.
5. Heart, Kidney किंवा Liver चा आजार कधी विचारात घ्यायचा? दोन्ही पायांना सूज असल्यास मोठा आजार असू शकतो: - Heart Failure / Dilated Cardiomyopathy: सूजेसोबत दम लागणं, झोपल्यावर श्वासाचा त्रास, वजन झपाट्याने वाढणं. - Chronic Kidney Disease: पायांची किंवा चेहऱ्याची सूज, लघवीत बदल; सुरुवातीला लक्षणं नसू शकतात. - Liver Cirrhosis: पायांची सूज, पोटात पाणी साचणं; दीर्घकाळ alcohol घेणं कारण असू शकतं. रक्तातील Albumin कमी असणंही सूजेचं कारण ठरू शकतं.
6. फक्त एका पायाला अचानक सूज आली? एका पायाला अचानक सूज, दुखणं, लालसरपणा किंवा गरमपणा असेल तर लवकर तपासणी करा. पायातील रक्तवाहिनीत clot (रक्ताची गाठ) असू शकतो. अचानक दम लागणं किंवा छातीत दुखणं असेल तर Emergency care घ्या.
7. रोज काय करता येईल? - दर तासाला काही मिनिटं चालणं आणि बसल्याजागी घोट्यांची हालचाल करणं. - आराम करताना पाय उंच ठेवणं. - अतिरिक्त मीठ आणि खारट packaged foods कमी करणं. - आरामदायक footwear वापरणं आणि दीर्घकाळ एकाच स्थितीत राहणं टाळणं. - सूज वारंवार येत असल्यास सकाळ-संध्याकाळचा फरक, वजन आणि BP चा trend नोंदवणं. - Compression stockings डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणं. - स्वतःहून Diuretic गोळी सुरू करू नका किंवा पाणी कमी करू नका. Heart / Kidney / Liver disease असल्यास डॉक्टरांनी दिलेल्या fluid मर्यादा पाळा.
8. तपासण्या कधी आवश्यक? सूज वारंवार येत असेल, टिकून राहत असेल किंवा वाढत असेल तर Kidney function, Urine protein, Albumin, Liver function आणि Thyroid तपासण्या लागू शकतात. Heart ची लक्षणं असतील तर ECG / Echo, पायांच्या शिरांचा प्रश्न असेल तर Venous Doppler उपयोगी पडतो. प्रत्येक सूजेसाठी सगळ्या तपासण्या आवश्यक नसतात.
तुमचा पाय संध्याकाळी सुजतो, मोज्यांचे वळ उमटतात, BP ची औषधं चालू आहेत किंवा Heart / Kidney / Liver disease असताना सूज वाढतेय तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दोन व्यक्तींना सारखीच घोट्याजवळ सूज असू शकते, पण कारण वेगळं असू शकतं: एकाला दिवसभर बसून राहणं कारण असतं, दुसऱ्याला BP ची गोळी, आणि तिसऱ्याला Heart, Kidney किंवा Liver चा आजार.
प्रत्येक सूज धोकादायक नसते, पण वारंवार येणाऱ्या सूजेचा pattern समजून घेणं महत्त्वाचं आहे.
Just For Hearts App वापरून Weight, BP, Activity आणि बदलणारी लक्षणं नियमित track करा. एक दिवसाची सूज फार काही सांगणार नाही, पण अनेक दिवसांचा pattern पुढचा निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI Senior Consultant Physician & Cardiologist Just for Hearts