Nutrition
संध्याकाळी Food Cravings समजून घेणे: कारणे आणि उपाय

संध्याकाळी काहीतरी गोड किंवा खारट खाण्याची तीव्र इच्छा अनेकांना होते, आणि ते Willpower कमी आहे की शरीर काहीतरी सांगत आहे का, असा प्रश्न पडतो.
अनेकदा विचारलं जातं: "डॉक्टर, दिवसभर Diet व्यवस्थित पाळतो, पण संध्याकाळी 5–6 वाजता गोड किंवा खारट काहीतरी खाल्ल्याशिवाय राहवत नाही. माझा Willpower कमी आहे का?"
माझं उत्तर असतं की प्रत्येक Craving म्हणजे शिस्तीचा अभाव नाही. ती कधी आणि कोणत्या परिस्थितीत येते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
खाण्याची इच्छा फक्त पोटातून येत नाही; Brain, Sleep, Stress आणि सवयी यांचा देखील मोठा सहभाग असतो.
1. खरी भूक आणि Craving यामध्ये फरक:
- Hunger: शरीराला अन्नाची गरज असते आणि अनेक पदार्थ खाण्यास तयार असतो. - Craving: पोट भरलं असतानाही विशिष्ट पदार्थ जसं की chocolate, मिठाई, चिप्स यांची तीव्र इच्छा होते.
Brain चं Reward System आणि पूर्वीच्या सवयी Craving मध्ये महत्त्वाच्या असतात. त्यामुळे प्रत्येक Craving म्हणजे खरी भूक किंवा Sugar कमी झाल्याचं लक्षण नाही.
2. Cravings वाढण्यामागील चार महत्त्वाचे कारणे:
- Meal Gap: Breakfast टाळणं, अपुरं Lunch किंवा जेवणात खूप अंतर ठेवणं यामुळे नंतर भूक आणि Craving वाढू शकते. - Protein & Fibre: जेवणात Protein आणि Fibre कमी असल्यास पोट भरल्याची भावना कमी वेळ टिकते. - Sleep: अपुरी झोप गोड आणि चविष्ट पदार्थांकडे आकर्षण वाढवते. - Stress & Habit: कामानंतर चहा-बिस्किटं, TV समोर Snacks यांसारख्या सवयी Craving वाढवू शकतात, कधीकधी भुकेपेक्षा सवयीचा प्रभाव जास्त असतो.
म्हणून Craving ही Food ची गोष्ट नसून आपल्या Daily Routine चा एक Clue असू शकते.
3. Cravings म्हणजे Insulin Resistance?
सरळ संबंध नाही. Hunger, Appetite आणि Glucose Regulation यांचा संबंध आहे, पण गोड खाण्याची इच्छा म्हणजे Insulin Resistance आहे असे म्हणता येत नाही.
प्रत्येक Craving नंतर Sugar तपासण्याची गरज नसते.
पण Diabetes ची औषधे घेत असताना अचानक तीव्र भूक, घाम, थरथर किंवा धडधड होत असेल तर Low Sugar ची शक्यता तपासणे महत्त्वाचे आहे.
4. Craving आली तर काय करायचं?
"गोड पूर्ण बंद करा" म्हणण्याऐवजी तीन प्रश्न विचारा:
- खरी भूक आहे का? शेवटचं जेवण कधी आणि किती झालं? - आज झोप आणि Stress कसा होता? थकल्यावर इच्छा वाढते का? - ही सवयीची वेळ आहे का? रोज ठराविक वेळी तोच पदार्थ हवा असतो का?
खरी भूक असल्यास योग्य Meal किंवा संतुलित Snack घ्या.
सवयीमुळे इच्छा असल्यास थोडा विराम घेऊन दुसऱ्या Activity मध्ये लक्ष द्या.
आवडता पदार्थ कधी तरी खाणं चुकीचं नाही. प्रश्न खाण्यावर बंदी घालण्याचा नाही, तर खाण्यामागचा निर्णय समजून घेण्याचा आहे.
5. पुढील 7 दिवसांचा JFH प्रयोग:
Craving आली की तीन गोष्टी लक्षात ठेवा:
- कधी? सकाळ, दुपार की संध्याकाळ? - काय? गोड, खारट की काही वेगळं? - का? भूक, थकवा, Stress की सवय?
Just For Hearts App मध्ये Diet, Sleep आणि Activity च्या नोंदी नियमित करा.
काही दिवसांचा Data जमा झाल्यावर IRA: Your AI Health Companion सोबत Food Habits आणि Cravings बद्दल चर्चा करा.
जितकी योग्य माहिती दाल, तितकी Routine संदर्भात चर्चा उपयुक्त होईल.
कदाचित लक्षात येईल की Craving रोज नसते, ती ठराविक परिस्थितीत अधिक होते.
वारंवार Cravings होतात, Diet बदलून फरक पडत नाही, Sugar किंवा औषधांबद्दल प्रश्न असतील तर तुमच्या खाण्याच्या सवयी आणि Health History सांगून विचार करा.
Craving नियंत्रित करण्याआधी त्याचा Trigger समजून घ्या.
प्रत्येक वेळी Willpower ला दोष देऊ नका.
कधीकधी झोप, जेवणाची वेळ किंवा रोजचं Routine बदलण्याची गरज असते.
Pattern Observe करा. Course Change करा.
टीप: अचानक भूक लागल्यावर घाम, थरथर, चक्कर किंवा गोंधळल्यासारखं वाटल्यास, विशेषतः Diabetes औषधे घेत असल्यास, Low Sugar तपासणी व योग्य उपचार आवश्यक आहेत.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी MD, DNB FSCAI Cardiology Senior Consultant Physician & Cardiologist Just For Hearts