Just For Hearts

Lifestyle

Eat Pray Love: संतुलित आयुष्यासाठी धडे

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

हा चित्रपट एका स्त्रीची कथा सांगतो, जिच्याकडे सगळं आहे, तरी Mind शांत नाही. ती आयुष्याला pause देते आणि तीन देशांतून प्रवास करते:

* Eat (इटली): आनंद, चव, जगण्याचा आस्वाद. * Pray (भारत): अंतर्मुखता, शिस्त, मनाची स्थिरता. * Love (बाली): समतोल, नातं, स्वतःशी जुळवून घेणं.

हा चित्रपट प्रवासाबद्दल नाही, तो Mind, Body आणि आयुष्य यांचा समतोल कसा साधायचा याबद्दल आहे.

ह्या चित्रपटावर आधारित Health आणि Wellbeing साठी 10 साधे परंतू deep meaning चे Life lessons:

1. आनंद guilt शिवाय घ्या. कधी मनसोक्त जेवण, हसू, थांबणं हेही Health चाच भाग. 2. Mind थकलंय का, Body आधी सांगतं. झोप बिघडणं, चिडचिड, थकवा ही Body ची भाषा आहे. ऐका. 3. सगळं सोडून जायची गरज नसते. कधी थोडं थांबणं म्हणजेच reset. 4. प्रार्थना म्हणजे Mind चा उपचार. Mind शांत असेल तर Body ही साथ देतं. 5. शांत बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही. Mind शांत झालं की निर्णय स्पष्ट होतात. 6. समतोल म्हणजे perfect routine नाही. काम, आनंद, एकांत सगळ्याला थोडी जागा. 7. स्वतःशी नातं जुळलं की इतर नाती सोपी होतात. पहिलं नातं, स्वतःशी. 8. Health फक्त Reports नाही. Mind शांत नसेल तर Body ही साथ देत नाही. 9. आनंद luxury नाही, गरज आहे. तो दुर्लक्षित केला की Body भरपाई मागतं. 10. स्वतःला वेळ देणं selfish नाही. ते survival आहे आणि उपचारही.

हा चित्रपट पाहिल्यावर सगळे इटलीला किंवा बालीत योग करायला जाणार नाहीत. पण एवढं नक्की होऊ शकतं:

* एक जेवण शांतपणे * एक दिवस स्वतःसाठी * एक सवय Mind साठी

आणि कधी कधी तेवढंच पुरेसं असतं. चित्रपट पाहिला नसला तरी संदेश सोपा आहे: आयुष्य सुधारायला आधी स्वतःकडे वळा.

#eat-pray-love#life-balance#mental-wellbeing#healthy-mind-healthy-body#self-care-is-health#mind-body-connection#wellbeing#personal-growth
Share:WhatsAppXFacebook