Diabetes
Diabetes बिघडतो तो गोडामुळे नाही, तर चुकीच्या timing मुळे
"Diabetes बिघडतो तो फक्त गोडामुळे नाही, तर रोजच्या चुकीच्या timing मुळे."
हा मुद्दा अनेकांना धक्का देतो कारण बहुतांश रुग्ण गोड पूर्ण बंद करतात पण वेळेची काळजी घेत नाहीत आणि तिथेच साखर बिघडते.
सोप्या मुद्द्यांत समजून घ्या:
1. उशिराचं जेवण = जास्त sugar रात्री 9–10 नंतर जेवलं की insulin response मंदावतो. परिणाम → सकाळची fasting sugar वाढलेली.
2. जेवणाच्या वेळा रोज बदलतात आज 1 ला जेवण, उद्या 4 ला. Body ला rhythm लागत नाही → sugar control ढासळतो.
3. औषध वेळेवर न घेणे औषध गोडासाठी नसतं, वेळेसाठी असतं. Late/early घेतल्याने effect कमी होतो.
4. मोठा उपास → नंतर भरपूर जेवण दिवसभर काहीच नाही, मग मोठं dinner. यामुळे post-meal sugar spike जोरात येतो.
5. Post-meal inactivity जेवणानंतर बसून राहणं / झोप. Muscles sugar वापरत नाहीत → sugar रक्तातच राहते.
6. चहा-कॉफीची चुकीची वेळ उशिरा caffeine → sleep खराब → insulin resistance वाढते.
7. Weekend timing चा गोंधळ Weekdays discipline, weekends गोंधळ. Sugar ला सुट्टी नसते.
8. Sleep timing विस्कळीत रात्री उशिरा झोप → cortisol वाढतो → sugar वाढते.
9. "मी गोड खात नाही" हा अपूर्ण निष्कर्ष आहे.
Diabetes बिघडवणारा मोठा घटक हा 1 चमचा साखर नाही, तर रोजची वेळेची चूक (meal timing + routine mismatch) आहे.
हजारो diabetic patients मध्ये post-meal timing सुधारल्यावर 20–40 mg/dL sugar reduction फक्त औषध न बदलता दिसून आली आहे.
म्हणूनच अनेक लोक गोड न खाऊनही साखर control मध्ये ठेवू शकत नाहीत.
गोड टाळणं गरजेचं आहे, पण वेळेची शिस्त ही खरी game-changer आहे.
तुम्हाला काय वाटतं? तुमची साखर गोडामुळे बिघडते की timing मुळे? Comment करा, चर्चा सुरू करूया.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts