Just For Hearts
← ब्लॉगवर परत

Diabetes

Diabetes म्हणजे फक्त Sugar चा आजार नाही: मग आपण फक्त Sugar कमी करण्यामागे का लागलोय?

Dr Ravindra L Kulkarni3 मिनिटांचे वाचन
Diabetes म्हणजे फक्त Sugar चा आजार नाही: मग आपण फक्त Sugar कमी करण्यामागे का लागलोय?

Diabetes म्हणजे फक्त Sugar चा आजार नाही. मग आपण फक्त Sugar कमी करण्यामागे का लागलोय?

आज World Diabetes Day आहे! गेल्या वर्षभरात आपण Insulin Resistance, Muscle, Fatty Liver, Sleep आणि Metabolic Health याबद्दल खूप चर्चा केली आहे.

२५+ वर्षांच्या Clinical Practice मधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे:

Type 2 Diabetes हा केवळ Sugar चा प्रश्न नाही. Insulin Resistance, अपुरा Insulin Response आणि संपूर्ण Metabolic Health यांचा तो आजार आहे.

Sugar वाढणं हा त्याचा दिसणारा परिणाम आहे!

आजकाल Diabetes Reversal च्या नावाखाली महागडे Programs, Detox, Supplements आणि औषधं बंद करण्याची आश्वासनं दिली जातात.

पण Diabetes सुधारण्यासाठी प्रत्येकाला महागडा Program लागत नाही आणि प्रत्येकाला Remission मिळेलच असं नाही!

चला, आज अशा १० सवयी पाहूया, ज्या कोणत्याही क्रमाने सुरू करता येतात.

Diabetes Care : १० बदल जे खरोखर महत्वाचे आहेत!

१. Liquid Sugar आधी कमी करा! Soft Drinks, Packaged Juices आणि गोड पेयं कमी करा. संपूर्ण फळं खा; फळं पूर्ण बंद करण्याची गरज नाही.

२. Carbs बंद नाही… Portion बदला! भात-पोळी बंद करण्यापेक्षा प्रमाण आणि गुणवत्ता सुधारा. जेवणात Protein, भाज्या आणि Fibre वाढवा.

३. जेवणानंतर १०–१५ मिनिटं चाला! सुरक्षित असेल तर Lunch किंवा Dinner नंतर हलकं Walking करा. Post-meal Sugar सुधारण्यासाठी ही छोटी सवय उपयोगी ठरू शकते.

४. Muscle ला काम द्या! Muscle हा Glucose वापरणारा महत्त्वाचा अवयव आहे. Walking सोबत आठवड्यातून किमान २ दिवस Strength Training करा. Gym आवश्यक नाही.

५. सलग बसण्याची सवय बदला! सकाळचं Walking चांगलं आहे; पण बाकी दिवस निष्क्रिय नको. शक्य असल्यास दर ३० मिनिटांनी थोडं उठून चाला.

६. Weight बरोबर Waist सुद्धा पाहा! पोटाभोवतीची चरबी Insulin Resistance शी संबंधित असते. जास्त वजन असल्यास सातत्यपूर्ण ५–७% Weight Reduction अनेकांसाठी अर्थपूर्ण ठरू शकतं.

७. Sleep ला उपचारांचा भाग माना! पुरेशी, नियमित झोप Glucose Regulation साठी महत्त्वाची आहे. घोरणं, वारंवार जाग येणं किंवा दिवसा डुलकी येणं दुर्लक्षित करू नका.

८. Meal Timing सांभाळा! उशिराचं मोठं Dinner, अनावश्यक Snacking आणि अनियमित जेवणाच्या वेळा कमी करा. कठोर Fasting सर्वांसाठी सुरक्षित नाही.

९. Stress कमी करा; Tobacco सोडा! Stress चा झोप, खाणं आणि Sugar Control वर परिणाम होऊ शकतो. रोज थोडा शांत वेळ राखा. Smoking/Tobacco पूर्णपणे टाळा.

१०. फक्त Sugar नाही… संपूर्ण Progress पाहा! HbA1c सोबत BP, Weight, Waist, Lipids, Sleep आणि Activity पाहा. Heart, Kidney, Eyes आणि Nerves ची आवश्यक तपासणीही नियमित करा.

बदल किती दिवसांत दिसू शकतो?

- काही दिवस–२ आठवडे: Sugar Readings मध्ये बदल जाणवू शकतो. - ४–१२ आठवडे: Weight, Waist आणि Fitness मध्ये सुधारणा दिसू शकते. - साधारण ३ महिने: HbA1c मधील अर्थपूर्ण बदल तपासता येतो. - काही महिने किंवा अधिक: योग्य उपचार आणि सातत्यपूर्ण Weight Reduction मुळे काही Type 2 Diabetes रुग्णांमध्ये औषधांची गरज कमी होऊ शकते किंवा Remission मिळू शकते.

पण Remission म्हणजे कायमचा Cure नाही! औषधं बंद करणं हे Diabetes Care चं अंतिम उद्दिष्ट नाही.

आज एक छोटा निर्णय घेऊया! दहाही गोष्टी एकदम करण्याची गरज नाही. आज कोणत्याही दोन सवयी निवडा. पुढील ३० दिवस सातत्य ठेवा.

तुमचे Steps, Sleep, Weight आणि आवश्यक Sugar/BP Readings Just For Hearts App मध्ये नोंदवा. App सगळ्यांसाठी आहे! Premium चा विचार नंतर करा. आधी स्वतःचा Health Pattern समजून घ्या.

Sugar Readings, औषधं, Diet, Remission किंवा App Tracking बद्दल प्रश्न असतील तर JFH ONE WhatsApp Chat वापरा.

Diabetes Treat करा. Metabolism सुधार करा. Future सुरक्षित ठेवा.

औषधं विरुद्ध Lifestyle असा संघर्ष नाही. योग्य औषधं + योग्य सवयी + सातत्यपूर्ण Monitoring = Better Diabetes Care.

Pattern Observe करा. Course Change करा.

महत्त्वाचं: Insulin किंवा Hypoglycemia होऊ शकणारी औषधं घेत असल्यास Diet, Fasting किंवा Exercise बदलताना काळजी घ्या. औषधं स्वतःहून बंद करू नका.

Diabetes Care ही भीती, महागडी आश्वासनं किंवा चमत्कारांवर नाही, तर योग्य ज्ञान, योग्य उपचार आणि रोजच्या कृतीवर आधारित असायला हवी.

लाखो लोकांनी वाचण्यापेक्षा काही हजारांनी जरी आज एक चांगली सवय सुरू केली, तरी हा World Diabetes Day सार्थकी लागेल! ❤️

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB FSCAI Cardiology Senior Consultant Physician & Cardiologist Just For Heart’s

#diabetes#type-2-diabetes#insulin-resistance#metabolic-health#diabetes-care#lifestyle-changes#world-diabetes-day
Share:WhatsAppXFacebook