Diabetes
डायबेटीस बिघडतो तेव्हा दोष फक्त अन्नावर नाही तर मनावरही असतो
डायबेटीस बिघडतो तेव्हा दोष नेहमी अन्नावर दिला जातो, पण अनेकदा खरं कारण मन असतं.
आजकाल रुग्ण diet बदलतात, walking वाढवतात, reports तपासतात, पण रात्री विचार थांबत नाहीत.
तुमची सकाळची साखर रात्रीच्या विचारांवर अवलंबून असते.
खरं सांगायचं तर साखर फक्त अन्नामुळे वाढत नाही, ती मनामुळेही वाढते.
चला, हे नीट समजून घेऊया:
1. Overthinking मुळे शरीर कायम 'stress mode' मध्ये असतं. सतत विचार, चिंता, काळजी → मेंदूला धोका वाटतो → शरीर survival mode मध्ये जातं.
2. Stress hormones थेट metabolism बदलतात. Overthinking मुळे Cortisol वाढतो, जो liver ला सांगतो: "रक्तात glucose सोड." → सकाळी sugar जास्त.
3. हे रोजच घडत असेल तर insulin resistance वाढते. Stress रोज असेल तर insulin नीट काम करत नाही आणि sugar control stubborn होतो, diet असूनही numbers हलत नाहीत.
4. झोप होते पण recovery होत नाही. अनेक रुग्ण सांगतात "झोप लागते, पण सकाळी fresh वाटत नाही." → disturbed mind = poor metabolic recovery.
5. मध्यम वयात हा परिणाम जास्त दिसतो. काम, finances, जबाबदाऱ्या, reports ची भीती → overthinking वाढते → metabolism थकतो → morning sugar वाढते.
6. स्त्री-पुरुषांत stress वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. स्त्रिया – सतत विचार, काळजी; पुरुष – न बोललेला ताण (silent stress) → दोघांचाही परिणाम साखरेवर होतो.
7. हे diet failure नाही, discipline चा दोष नाही. हा nervous system चा imbalance आहे आणि तो फक्त औषध वाढवून लगेच सुधारत नाही.
8. Morning sugar म्हणजे 'रात्रीच्या मनाचा report'. एक reading पाहून panic करू नका, 5-7 दिवसांचा trend पाहा. Pattern समजला की control सोपा होतो.
9. लगेच करता येणारे 3 छोटे पण प्रभावी उपाय: - झोपण्याआधी 30 मिनिटे mobile / news बंद करा. - 4-6 slow breathing करा (श्वास बाहेर जास्त वेळ ठेवा). - मनात एक वाक्य म्हणा: "आज जे माझ्या हातात आहे तेवढंच पुरे."
Science काय सांगते? - Chronic stress → cortisol वाढतो → glucose output वाढतो. - Poor sleep आणि stress → insulin sensitivity कमी होते.
माझा अनुभव: Morning sugar वाढली म्हणजे औषध अपयशी नाही. शरीर सांगतंय "मन थकलं आहे."
मन शांत → hormones संतुलित → metabolism सहकार्य करतो → sugar आपोआप सोपी होते.
चर्चा करूया: stress असलेल्या दिवशी तुमची सकाळची sugar वेगळी असते का?
ही माहिती share करा कारण अनेक diabetics नको त्या guilt मध्ये जगतात.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts