Just For Hearts

Lifestyle

कॉर्पोरेट Wellness आता इतका 'प्रगत' झालाय की...

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

कॉर्पोरेट Wellness आता इतका 'प्रगत' झालाय की कर्मचाऱ्यांचं BP, ताण, साखर यांचं निरीक्षण होतं, पण त्यांच्या 10 लाखांच्या पोपटासाठी urgent wellness support लागतो!

दहा वर्षांत भारतभर Just For Hearts या Healthcare Start up च्या माध्यमातून कॉर्पोरेट Wellness मध्ये काम केलं आहे—Srinagar ते Trichy, Mumbai ते Bhubaneswar.

Health talks, webinars, disease management, second opinions, health carnivals हे सगळे Hospitals आणि patients सोबत चालू ठेवून केले.

Stress, burnout, high BP, prediabetes असलेले लाखो employees पाहिले आहेत.

COVID नंतर Corporate wellness events कमी झाले, Remote Monitoring आणि Chronic care plans वर काम वाढलं.

काल एका broker मित्राला भेटलो, जो पूर्वी सहकारी होता आणि आता leading insurance broker company मध्ये AVP आहे. तो त्रस्त होता, Pet Dr शोधत होता.

त्याचं वाक्य अजूनही कानात आहे: "एक IT employee ने 10 लाखांचा African पक्षी (नाव अवघड असल्यामुळे तो फक्त 10 लाखांचा पोपट म्हणाला 😊) आणलाय आणि आता pet cover असल्यामुळे Pet Dr Arrange करा म्हणतोय.

मला विचारत होता, कोण असेल तर सांगा, payment no issues.

पण त्याचबरोबर माझे cardiologist session कमी cost मध्ये पाहिजे, जमले तर free च करा म्हणे."

आजची corporate equation फार विचित्र आहे: - Pet care = Premium पाहीजे - Employee care = Discounted, स्वस्तात - Wellness = Checklist प्रमाणे - Young heart attacks = वाढत आहेत

Employee → Family → Dependents → आता Pets (ज्याबद्दल पूर्वी काही हरकत नव्हती).

पण employee? ज्याच्या wellness साठी budget कमी नसते, पण execution मध्ये misplaced priorities आणि खूप subcontracting होते!

जर Health talks 1000 मध्ये आणि whole body check up 400 मध्ये करायचा असेल तर quality काय अपेक्षित आहे?

Employee ची स्थिती तशीच राहते: जुना ताण, poor sleep, वाढलेली LDL, belly fat...

आणि आज sudden heart attacks जास्त होत आहेत.

Photos, events, brochures—जास्त. Real health improvement—कमी.

तुमच्या ऑफिसमधील wellness खरंच employee-centric आहे की फक्त फोटो-कलेक्शन आहे? कृपया तुमचा अनुभव नक्की लिहा. चर्चा गरजेची आहे.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#corporate-wellness#employee-health#stress#young-heart-attacks#pet-care#healthcare#cardiology
Share:WhatsAppXFacebook