Just For Hearts

Heart Health

छातीत दुखतंय: Sorbitrate घ्यायची की Disprin?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

छातीत दुखतंय यामुळे Sorbitrate किंवा Disprin घेण्याचा निर्णय अनेकदा घाईत घेतला जातो. पण योग्य माहिती नसल्यास panic आणि चुका वाढतात.

ICU आणि emergency मध्ये वारंवार दिसते की लोक औषधं घेतात पण त्यांचा उपयोग काय आहे हे स्पष्ट माहित नसते.

1. छातीत जडपणा, दाब, घाम, हात किंवा जबड्यात दुखणं असेल तर heart attack ची शक्यता लक्षात घ्यावी. वेळ खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्वरित medical help मिळवणं आवश्यक आहे.

2. Sorbitrate काय करते? Sorbitrate (Nitroglycerin) जीभेखाली घेतल्यावर रक्तवाहिन्या (blood vessels) रुंद होतात. त्यामुळे heart वरचा ताण कमी होतो आणि छातीतला दाब किंवा heaviness कमी वाटू शकतो. पण ही pain killer नाही आणि heart attack थांबवणारी definitive treatment देखील नाही.

3. Disprin का दिली जाते? Disprin (Aspirin 325 mg) platelets चिकटून clot वाढू नये यासाठी मदत करते. Heart attack मध्ये clot वाढणं कमी करणं महत्त्वाचं असतं, म्हणून emergency मध्ये Aspirin life-saving ठरू शकते. शक्य असल्यास ती चावून किंवा पाण्यात विरघळवून घेतली जाते कारण absorption जलद होतो.

4. दोन्ही गोळ्या म्हणजे complete उपचार नाहीत. त्या emergency प्रथमोपचाराचा भाग आहेत, angioplasty किंवा hospital treatment ची जागा कोणतीही गोळी घेऊ शकत नाही. Heart attack मध्ये "गोळी घेतली म्हणजे धोका टळला" हा सर्वात धोकादायक गैरसमज आहे.

5. Sorbitrate सर्वांना सुरक्षित नसते. विशेष काळजी घ्यावी जर BP खूप कमी असेल, चक्कर, घाम, weakness जास्त असेल, किंवा erectile dysfunction ची औषधं (sildenafil/tadalafil) घेतली असतील. अशा वेळी Sorbitrate मुळे BP धोकादायकरीत्या कमी होऊ शकतो.

6. Disprin देखील सर्वांना लागू नाही. काळजी घ्यावी जर ulcer, पित्ताचा त्रास, bleeding tendency, आधी रक्तस्रावाचा history असेल किंवा काही blood thinner औषधं चालू असतील.

7. Panic नको पण delay देखील नको. योग्य गोळी योग्य वेळी उपयोगी पडू शकते पण चुकीचा अंदाज धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे symptoms ओळखा, वेळ दवडू नका आणि hospital ला पोहोचणं हेच priority ठेवा.

8. ICU मधून एक वास्तव: काही रुग्ण वेळेत पोहोचतात आणि muscle वाचतो. काहीजण घरीच "gas असेल" म्हणत थांबतात आणि damage कायमचं राहून जातं. फरक अनेकदा फक्त timing मध्ये असतो.

Sorbitrate आणि Disprin या घरच्या emergency kit चा भाग असू शकतात पण कोणासाठी, किती dose आणि कोणत्या परिस्थितीत हे आधी तुमच्या डॉक्टरांकडून स्पष्ट करून घेणं महत्त्वाचं आहे.

तुमच्या घरी कुणाला अचानक छातीत दुखायला लागलं तर तुम्हाला काय करायचं हे आता समजले असावे. अनुभव comment मध्ये नक्की लिहा कारण awareness emergency मध्ये decision बदलतो.

हा post कुटुंबात आणि WhatsApp groups मध्ये नक्की share करा. emergency मध्ये योग्य माहिती panic कमी करते आणि कधी कधी जीवही वाचवते.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-attack#sorbitrate#disprin#emergency-care#chest-pain#cardiology
Share:WhatsAppXFacebook