Just For Hearts

Heart Health

Angioplasty / Bypass नंतरही श्वास का लागतो?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Angioplasty / Bypass नंतरही श्वास का लागतो? Heart problem संपला असं वाटतं… पण शरीर वेगळं सांगतं.

“Doctor, stent घातला आहे… सगळे reports normal आहेत… पण थोडं चाललं तरी दम लागतो.” हे वाक्य रोज ऐकायला मिळतं.

हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. पण घाबरण्याचंही कारण नाही.

सोप्या शब्दात कारण समजून घेऊया:

1. Blockage काढली म्हणजे Heart लगेच मजबूत होत नाही. Angioplasty / Bypass ने रक्ताचा रस्ता मोकळा होतो. पण Heart चा muscle आधीच थकलेला किंवा कडक झालेला असू शकतो.

2. Heart दोन कामं करतो. एक - रक्त जोरात पुढे ढकलतो. दुसरं - आरामात relaxation होऊन रक्त आत घेते.

3. काही लोकांत problem “जोरात ढकलण्याचा” असतो (pumping). Heart थकलेला → शक्ती कमी → दम लागतो.

4. काही लोकांत problem “Relax होण्याचा” असतो. Heart कडक → नीट Relax होत नाही → आत Pressure वाढतो → श्वास लागतो.

हे muscle relaxation problem आहे. Heart Relax होत नाही, जसं शरीरात stiffness असते तसं.

5. म्हणूनच Echo normal असूनही त्रास होतो. Report मध्ये pumping ठीक दिसतं, पण Heart आतून ताणलेला असतो.

6. लक्षात ठेवा, हा त्रास तुमच्या चुकीमुळे नाही. हा आळस, कमजोरी किंवा वयाचा दोष नाही.

7. यावर उपाय आहेत: योग्य औषधं, योग्य हालचाल, योग्य जीवनशैली. हे सगळं एकत्र केल्यावर फरक पडतो.

स्वतःला विचारायचे 3 प्रश्न: - चालताना वारंवार थांबावं लागतं का? - जिने चढताना छातीत जडपणा / दम येतो का? - रात्री उशी वाढवावी लागते का?

उत्तर “हो” असेल तर हे ignore करू नका.

8. आजपासून दम येण्याची वेळ आणि कारण लिहून ठेवा. चालताना? जेवणानंतर? रात्री झोपताना? ही माहिती treatment खूप उपयोगी पडते.

9. हे पहिलं पाऊल आहे… ही पोस्ट Heart Failure Rehab Series मधली पहिली पोस्ट आहे.

तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी. तुम्हाला किंवा घरात कुणाला Angioplasty / Bypass नंतर दम लागत असेल, तर comment मध्ये लिहा: “दम कधी आणि कसा लागतो?” तुमच्या प्रश्नांवर पुढच्या पोस्ट्स ठरवूया.

Dr. Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-failure-rehab#after-angioplasty#breathlessness#heart-care#cardiac-rehab#post-bypass-care#heart-health
Share:WhatsAppXFacebook