General Health
Brain fog… लक्ष लागत नाही… हे फक्त Stress आहे का?
Brain fog… लक्ष लागत नाही… हे फक्त Stress आहे का?
अनेक जण सांगतात “डोकं जड वाटतं…” “लक्ष लागत नाही…”
बहुतेक वेळा याला Stress म्हटलं जातं. पण प्रत्येक वेळी तसं नसतं.
कधी कधी हा संकेत असतो शरीरात चालू असलेल्या सूक्ष्म दाहाचा inflammation.
1. Brain fog म्हणजे काय? ही disease नाही. पण लक्ष न लागणं, विचार मंदावणं, clarity कमी होणं ही त्याची लक्षणं.
2. मेंदू आणि शरीर जोडलेले आहेत झोप, पोट (gut), sugar, inflammation. हे सगळं मेंदूच्या कामावर परिणाम करतं.
3. inflammation मेंदूवर कसा परिणाम करतो? सूक्ष्म दाह वाढला की मेंदूचे signals बदलतात. attention आणि alertness कमी होऊ शकते.
4. पोट–मेंदू संबंध (gut–brain axis) पोट बिघडलं की मेंदूवर परिणाम दिसतो. bloating, acidity सोबत mood आणि focus बदलू शकतो.
5. मेंदूतील रसायनं (neurotransmitters) Serotonin (मूड), Dopamine (उत्साह), GABA (शांतता) यांचा balance बिघडला तर brain fog वाढतो.
6. झोप झाली तरी fresh का वाटत नाही? झोपेत मेंदू repair आणि “cleaning” करतो. झोपेची quality कमी असेल तर सकाळी clarity कमी वाटते.
7. जेवल्यानंतर सुस्ती का येते? हे फक्त “जास्त खाण्यानुळे” नसतं तर sugar balance आणि metabolism चा संकेत असू शकतो.
8. Stress एकटाच कारण नसतो Stress + दाह + lifestyle imbalance हे एकत्र आले की परिणाम जास्त होतो.
9. सुरुवात subtle असते फक्त लक्ष कमी वाटतं… पण पुढे mood, productivity बदलते.
10. लक्षात ठेवा Brain fog हा problem नाही… तो एक signal आहे. शरीरात काहीतरी balance बिघडलं आहे. लक्ष लागत नाही म्हणजे मन कमकुवत नाही… शरीर मदतीचा इशारा देत असतं.
Brain fog कमी कसा करायचा? झोप, पोट, sugar आणि दाह यावर step by step पुढील काही posts मध्ये, stay tuned.
तुम्हाला brain fog कधी जास्त जाणवतो? * रोज * कधी कधी * झोप कमी झाली की * जेवणानंतर
Patterns समजून घेणं ही पहिली पायरी आहे. पुढची पायरी, स्वतःचे signals track करणं.
Just For Hearts वर basic vitals tracking आणि self-assessment surveys कायम free आहेत.
Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology), Just For Hearts.