Gut Health
Bloating: फक्त Gas नाही…
Bloating = फक्त Gas नाही… तो शरीराचा “Digestion-Metabolism बिघडतोय” असा पहिला इशारा आहे.
पोट फुगल्यासारखं वाटणं, जेवणानंतर जडपणा, कडकपणा, ढेकरा, थकवा – हे सगळं म्हणजे Bloating.
OPD मध्ये एक गोष्ट वारंवार दिसते: Bloating ही अनेकदा Diabetes, Obesity, Heart Disease आणि काही Medicines शी जोडलेली असते.
Bloating का वाढतं?
1. Digestion ची rhythm बिघडते: अनियमित वेळा सतत खाणं उशिरा जेवण → Digestion संथ होतं → Gas वाढतो.
2. Diabetes आणि Obesity मध्ये जास्त का? • Diabetes → Digestion ची Nervous System मंद • Obesity → पोटात दाब वाढतो • Insulin resistance → आतड्यांत Inflammation म्हणून Bloating persistent असतं.
3. काही Medicines Bloating वाढवतात: Metformin, Calcium, Iron Painkillers, काही BP Medicines 👉 Medicine बंद करू नका; फक्त timing आणि dose योग्य ठेवा.
4. सकाळची छोटी सवय: कोमट पाणी + सुंठ / ओवा → Digestion जागं होतं → Gas बाहेर पडायला मदत.
5. दिवसात 2–3 ठराविक जेवण: सतत खाणं = Digestion ला विश्रांती नाही. Meal gap दिला की enzymes नीट काम करतात.
6. जेवणानंतर 10–15 मिनिट चालणं: ही नैसर्गिक Digestion ची गोळी आहे. जडपणा, Reflux, Bloating कमी होतं.
7. “Gas foods” सगळ्यांसाठी सारखे नसतात: कडधान्य, ब्रेड, पनीर, Cold Drinks मात्रा, combination आणि वेळ महत्त्वाची.
8. आठवड्यातून 1 gut-reset day: साधं अन्न, Soup, वाफवलेल्या भाज्या कधी कधी हलका उपास → आतडी recover होतात.
9. रोज हालचाल हवीच: चालणं, श्वसन, twisting Yoga → Bowel movement सुधारतो.
कधी Bloating दुर्लक्षित करू नका?
• अचानक वाढ • Weight loss, Anemia • Vomiting, Black Stool • Heart Disease + तीव्र Bloating 👉 तपासणी गरजेची.
Bloating वर Medicine देणं सोपं आहे. पण सवयी, वेळा आणि Medicines चा योग्य वापर दुरुस्त केला नाही तर ते परत-परत येतंच.
Digestion सुधारलं तर → Sugar control सुधारतो → Weight loss करणं सोपं होतं → हृदयावरचा ताण कमी होतो.
तुम्हाला Bloating कधी जास्त जाणवतं? जेवणानंतर? Medicine नंतर? की सतत? कमेंटमध्ये लिहा. चर्चा करूया. पोस्ट उपयुक्त वाटली तर Share / Repost करा.
ही पोस्ट सर्वांसाठी आहे. पण जे लोक म्हणतात “मला रोज काय करायचं ते स्पष्ट हवं” त्यांच्यासाठी Just For Hearts मध्ये एक structured मार्ग वेगळा ठेवलेला आहे. सगळ्यांसाठी नाही. पण तयार असणाऱ्यांसाठी उपयुक्त.
Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow Just for Hearts