Just For Hearts

Heart Health

“मी ठीक आहे” हा सगळ्यात मोठा भ्रम

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

ICU मध्ये येणाऱ्या अनेक रुग्णांच्या history मध्ये एक वाक्य हमखास असतं "मी ठीक होतो." हे वाक्य ऐकलं की मला कळतं शरीर बराच काळ सिग्नल देत होतं, पण मनाने ऐकलं नव्हतं.

1. “मी ठीक आहे” हा diagnosis नाही. तो एक emotional comfort आहे, clinical assessment नाही. शरीर भावना नाही ऐकत, ते physiology वर चालतं.

2. रोग आवाज करत नाही. BP वाढतं, दुखत नाही. Sugar fluctuate होते, कळत नाही. Weight वाढतो, urgent वाटत नाही. Pain नसला म्हणजे problem नसतो असं नाही.

3. Busy म्हणजे healthy नाही. दम लागणं “वय” म्हणतो. थकवा “काम जास्त” म्हणतो. Sleep कमी असते, पण ego चालू असतो.

4. Single report म्हणजे truth नाही. आज BP normal. आज sugar ठीक. पण pattern? Trend? Variability? Medicine मध्ये snapshot पेक्षा pattern महत्त्वाचा असतो.

5. Metabolic disease हळूहळू तयार होतो. तो वर्षानुवर्षं vascular damage तयार करतो. Collapse अचानक दिसतो कारण damage silent होता.

6. Fear temporary असतो. ICU नंतर 3-6 महिने discipline. नंतर पुन्हा “मी ठीक आहे.” Memory कमी पडते. Habit जिंकते.

7. महत्वाचा प्रश्न: तुम्ही evidence वर ठीक आहात? की assumption वर?

8. विचार करा: • शेवटचं full check up कधी केलं? • Waist measurement माहित आहे? • Sleep quality track करता? • Stress consciously manage करता?

10. Warning: “मी ठीक आहे” हे वाक्य कधी कधी सर्वात मोठा धोका असतो. कारण रोग नाही वाढत, आपले दुर्लक्ष वाढत असते.

हा पोस्ट फक्त वाचू नका. ज्याला वाटतं “माझं काही बिघडलं नाही” त्याच्यापर्यंत पोहोचवा.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#icu#silent-risk#cardiometabolic#health-awareness#diagnosis#metabolic-disease#blood-pressure#stress-management
Share:WhatsAppXFacebook