Just For Hearts

Lifestyle

आपण अंधार हरवलोय का?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

आपण अंधार हरवलोय का?

गावात संध्याकाळ व्हायची आणि दिवस आपोआप संपायचा. दिवे कमी, आकाश दिसायचं. रात्र म्हणजे विश्रांती.

आज शहरात? रात्री 11 वाजता घर पूर्ण उजळलेलं. हातात Mobile, डोळ्यांसमोर Screen. आपण प्रकाश जिंकलो. पण अंधार गमावला.

शरीराला अंधाराची गरज का असते?

आपल्या शरीरात एक जैविक घड्याळ आहे circadian rhythm (suprachiasmatic nucleus SCN).

सूर्यप्रकाशाने ते सुरू होतं. अंधाराने ते शांत होतं. अंधार पडला की melatonin वाढतो. तो फक्त झोपेसाठी नाही. तो antioxidant आहे. Immune regulation मध्ये मदत करतो. Hormonal rhythm समन्वयित ठेवतो.

Artificial light काय बदलतो?

1. Melatonin suppress होतो Blue light exposure रात्री melatonin secretion कमी करू शकतो (Controlled lab studies मध्ये 40–50% suppression दिसलेला आहे). झोप उशिरा लागते. Recovery उशिरा सुरू होते.

2. Sleep quality कमी होऊ शकते Evening screen exposure sleep latency वाढवतो आणि deep sleep कमी करू शकतो. Deep sleep म्हणजे repair window.

3. Next-day sugar handling वर परिणाम Short-term sleep restriction studies दाखवतात की sleep कमी झाली की insulin sensitivity घटते. रात्री उशिरापर्यंत प्रकाश + Screen पुढच्या दिवशी metabolic response बदलू शकतो.

4. BP dipping pattern disturb होऊ शकतो नैसर्गिकरित्या रात्री BP 10–20% कमी होतो. Poor sleep आणि circadian disturbance हे non-dipping BP pattern शी जोडले गेले आहेत.

5. Shift work - मोठा संकेत Shift workers मध्ये obesity, diabetes आणि heart disease चा धोका जास्त आढळतो.

6. Artificial light + Late night eating = double load रात्री glucose tolerance नैसर्गिकरित्या कमी असते. त्यावर उशिराचा Screen exposure आणि जेवण हे शरीरासाठी दुहेरी metabolic stress ठरू शकतं.

आपण विचारच करत नाही

आपण diet सुधारतो. Walking करतो. Strength training करतो.

पण bedroom मध्ये standby LED, notification light, Mobile screen, कायम चालू.

अंधार ही luxury नाही. ती biological गरज आहे.

#artificial-light#sleep-health#circadian-rhythm#urban-lifestyle#hormone-balance#night-routine#heart-health#metabolic-health
Share:WhatsAppXFacebook