General Health
Antioxidants: शरीराची “धूर साफ करणारी” यंत्रणा
ऊर्जा तयार करताना शरीरात “धूर” (oxidative stress) तयार होतो. हा धूर शरीर नेमका कसा नियंत्रित ठेवतं? हे समजून घेऊयात.
Antioxidants नेमकं काय करतात? ऊर्जा तयार करताना तयार होणारे Reactive Oxygen Species (ROS) / धूर हे अत्यंत प्रतिक्रियाशील कण असतात. Antioxidants त्यांना निष्क्रिय (neutralize) करून त्यांची हानी करण्याची क्षमता कमी करतात. सोप्या भाषेत, धूर तयार होणं नैसर्गिक आहे, पण तो साचू न देणं हे Antioxidants चं काम आहे.
शरीरातील “internal Antioxidants” सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपलं शरीर स्वतः Antioxidants तयार करतं. उदा. - Glutathione - Catalase - Superoxide dismutase ही प्रणाली सतत पेशींच्या आत काम करत असते. म्हणजेच शरीरात 24 तास एक शांत “cleaning system” चालू असतं.
मग बाहेरून Antioxidants का? फळं, भाज्या, nuts मधून मिळणारे Antioxidants हे शरीराला support (मदत) करतात. पण लक्षात ठेवा, मुख्य सफाई शरीराची स्वतःची प्रणालीच करते. म्हणूनच, फक्त supplement वर भर दिला तर अपेक्षित परिणाम मिळत नाही.
Antioxidants वाढतात का? हो, शरीर हुशार आहे. जेव्हा गरज वाढते उदा. योग्य व्यायाम, तेव्हा शरीर Antioxidant system अधिक सक्रिय करतं. पण दीर्घकाळ झोपेचा अभाव, ताण, चुकीचा आहार ही प्रणाली थकवू शकतात.
Balance कधी बिघडतो? जेव्हा: - धूर (ROS) जास्त तयार होतो - आणि Antioxidant क्षमता कमी पडते तेव्हा imbalance तयार होतो, oxidative stress वाढतो, पुढे inflammation सुरू होतो.
आपण हे मोजू शकतो का? Direct मोजणं रोजच्या OPD मध्ये शक्य नसतं. पण आपण indirect संकेत पाहतो: - CRP - HbA1c - आणि एकूण lifestyle pattern अनुभवानं कळतं balance कुठे बिघडतो आहे.
OPD मधील वास्तव अनेकदा रुग्ण विचारतात, “कोणता Antioxidant supplement घ्यावा?” पण खरं उत्तर असं असतं, शरीराची आतली प्रणाली मजबूत नसेल तर बाहेरून दिलेली मदत मर्यादितच राहते.
Oxidative Damage (पेशींना होणारं नुकसान) हा धूर नेमका कसा हानी करतो? हे next post मध्ये.
माझे मत: आरोग्य टिकवायचं असेल तर धूर / oxidative stress कमी करण्यापेक्षा सफाई करणारी यंत्रणा मजबूत करणं अधिक महत्त्वाचं आहे.
ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का? - हो, नक्की - खूप छान समजलं - आणखी जाणून घ्यायचं आहे
जर उपयुक्त वाटली असेल तर ही पोस्ट आपल्या मित्र-परिवारात जरूर share करा, आरोग्याविषयी अशी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचायला.