Mental Wellness
Awakening Joy - खऱ्या आनंदाकडे नेणारी 10 पावलं
Awakening Joy - खऱ्या आनंदाकडे नेणारी 10 पावलं
(Awakening Joy - James Baraz आणि Shoshone Alexander यांच्यापासून प्रेरित)
OPD मध्ये रोज ऐकतो “Doctor, सगळं आहे… पण आनंद नाही.”
काम, जबाबदाऱ्या, कुटुंब सगळं असूनही आत कुठेतरी रिकामेपण जाणवतं.
हे पुस्तक एक साधी पण खोल गोष्ट सांगतं - आनंद हा goal नाही. तो रोज जागवायचा अनुभव आहे.
खाली खऱ्या आनंदाकडे नेणारी 10 पावलं:
1. आनंद बाहेर शोधू नका परिस्थिती बदलली की आनंद येईल हा भ्रम आहे. जे आहे त्याकडे लक्ष दिलं की समाधान वाढतं.
2. Attention म्हणजे शक्ती ज्या गोष्टीकडे लक्ष देता तीच तुमच्या आयुष्याची चव ठरवते. जे ठीक आहे ते notice करा.
3. कृतज्ञता ही रोजची सवय आहे मोठं काही नको. आजचा चहा, झोप, एखादं हसू इतकं पुरेसं असतं.
4. आनंद म्हणजे समस्या नसणं नाही दुःख आणि थकवा येणारच. आनंद म्हणजे त्यांच्यासोबतही स्थिर राहणं.
5. स्वतःशी थोडं सौम्य व्हा आपण स्वतःला फार कठोर असतो. दयाळूपणा आधी स्वतःपासून सुरू करा.
6. इतरांसाठी थोडं करा एक फोन, एक message, एक छोटा help मन हलकं करतं.
7. मनाला शांत करायचं असेल, तर आधी शरीराची घाई थांबवावी लागते. आनंद फक्त विचारांत नाही. हळू श्वास, थोडी विश्रांती खूप फरक पाडते.
8. तुलना कमी करा प्रत्येकाची वेळ आणि वाट वेगळी असते. Social media हे वास्तव नाही हे लक्षात ठेवा.
9. Motivation नाही, routine महत्वाची Motivation येते-जाते. रोजच्या छोट्या सवयी आनंद टिकवतात.
10. आनंद ‘नंतर’ ठेवू नका परफेक्ट वेळ क्वचितच येतो. आजच्या दिवसातच एक छोटा आनंद जागवा.
आनंद हे भविष्यातलं बक्षीस नाही. तो वर्तमानात शिकायचा कौशल्य आहे.
या 10 पैकी आज तुम्हाला कोणती पायरी जास्त गरजेची वाटते? Comment मध्ये नक्की लिहा. चर्चेतूनच clarity वाढते.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts