Just For Hearts

Diabetes

Diabetes बद्दल 10 स्पष्ट निरीक्षणे जे प्रत्येकाने जाणून घ्यावीत

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

बहुतेक लोक sugar मोजतात पण आजार समजून घेत नाहीत.

म्हणून आधी Diabetes बद्दल 10 basic गोष्टी स्पष्ट करूया.

1. Diabetes फक्त गोड खाल्ल्यामुळे होत नाही. रक्तातील साखर वाढते कारण शरीरात insulin जास्त काळ जास्त प्रमाणात राहतो. Insulin म्हणजे शरीराला साखर पेशींमध्ये ढकलणारा hormone. जेव्हा तो सतत जास्त राहतो तेव्हा शरीर त्याला प्रतिसाद देणं कमी करतं.

2. Sugar हा आजार नाही, तो एक signal आहे. रिपोर्टमध्ये दिसणारा sugar हा परिणाम आहे. खरी समस्या असते insulin resistance (म्हणजे शरीर insulin ऐकणं कमी करतं).

3. दिवसभर थोडं-थोडं खाणं शरीराला थकवतं. प्रत्येक snack → insulin वाढतो. दिवसभर काहीतरी खात राहिलो तर शरीराला metabolic rest मिळत नाही.

4. Diabetes मध्ये “कधी खातो” हेही महत्त्वाचं आहे. Late dinner → रात्री metabolism मंदावतो. म्हणून सकाळचा sugar वाढलेला दिसतो. Body clock चा sugar control वर परिणाम होतो.

5. Low-fat खाल्लं की diabetes बरा होतो असं नाही. समस्या fat नाही. समस्या आहे: • refined मैदा • bakery पदार्थ • गोड पेय • processed snacks

6. Carb पूर्ण बंद करण्याची गरज नसते. Carb ची quality महत्त्वाची. ✔ भाकरी ✔ डाळ ✔ भाज्या हे शरीराला हळूहळू ऊर्जा देतात. पण ❌ मैदा ❌ biscuits ❌ sugary drinks हे sugar पटकन वाढवतात.

7. Fasting म्हणजे उपाशी राहणं नाही. Fasting म्हणजे insulin कमी होण्याची संधी. तेव्हा शरीर stored energy वापरायला सुरुवात करतं.

8. Exercise sugar जाळण्यासाठी नाही. Exercise चा मुख्य फायदा शरीर insulin ला पुन्हा ऐकू लागतं. म्हणून movement म्हणजे metabolism साठी औषध.

9. Diabetes नेहमीच वाढत जाणारा आजार असतो असं नाही. Routine बदलला तर trajectory बदलू शकते. अनेक रुग्णांमध्ये control सुधारलेलं दिसतं.

10. औषधं आवश्यक असतात, पण ती एकटी पुरेशी नसतात. Sugar control मध्ये मोठा वाटा असतो: • जेवणाची वेळ • चालणं • झोप • वजन आणि muscle

आपण रोज विचारतो “माझा sugar किती आहे?” पण खरं विचारले पाहीजे “माझ्या शरीराला insulin पासून आराम कधी मिळतो?”

हा प्रश्न समजला की Diabetes समजायला सुरुवात होते.

Diabetes बद्दल बोलण्यापूर्वी basic समज स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#diabetes#insulin-resistance#sugar-control#lifestyle-medicine#metabolism#preventive-health#heart-health
Share:WhatsAppXFacebook