Mental Wellness
रोज जगण्यासाठी 10 शांत पण ताकदीच्या गोष्टी - The Daily Stoic
बाहेरच्या गोंधळातही आतून स्थिर, संयमी आणि विवेकी राहण्याची जीवनशैली म्हणजेच Stoicism / स्थितप्रज्ञ विचारधारा / संयमी शहाणपणाची जीवनपद्धती.
आपण आयुष्य बदलायचा प्रयत्न करतो. Stoic विचार शिकवतो की आधी स्वतःची प्रतिक्रिया बदला, आयुष्य आपोआप बदलतं.
1. Control आणि No-Control ओळखा सगळं आपल्या हातात नसतं. पण आपले विचार, प्रतिक्रिया, निवडी नेहमी आपल्या हातात असतात. खरं शहाणपण इथून सुरू होतं.
2. Stress परिस्थितीमुळे नाही तो आपण दिलेल्या अर्थामुळे वाढतो. घटना एकच असते, मन वेगवेगळ्या कथा बनवतं.
3. शांतपणा म्हणजे कमजोरी नाही तो भावनांवर नियंत्रण आहे. ताबडतोब प्रतिक्रिया देणं हे सामर्थ्य नाही. योग्य वेळी योग्य प्रतिसाद देणं ही ताकद आहे.
4. आजचा दिवसच खरा आहे भूतकाळ बदलत नाही. भविष्य अजून आलंच नाही. आजची शिस्त उद्याचं आयुष्य घडवते.
5. लोक बदलतील अशी अपेक्षा नका ठेवू लोक तसेच राहतील. परिस्थितीही नेहमी न्याय्य नसते. आपण कसं प्रतिसाद देतो त्यावरच आपली शांतता आहे.
6. शिस्त म्हणजे स्वतःवर प्रेम झोप, चालणं, वेळेवर जेवण हे फक्त health tips नाहीत. हे Stoic साधनं आहेत.
7. Ego कमी, निरीक्षण जास्त सगळं personal नसतं. पहिले पाहा, मग बोला. भावना येतील, शांत निर्णय घ्या.
8. बाहेरचं सुख टिकाऊ नसतं पैसा, पद, मान हे सगळं बदलणार. आतली स्थिरता असेल तरच आनंद टिकतो.
9. अडचणी म्हणजे training कठीण वेळ शिक्षा नाही. ती आपल्याला मजबूत करण्यासाठी येते. प्रश्न विचारा 'हे मला काय शिकवतंय?'
10. रोज थोडं सुधारत जा मोठा बदल एकाच दिवशी होत नाही. पण रोजचा छोटा सुधार मनाला दिशा देतो.
जग बदलायचा हट्ट नको. आज स्वतःला थोडं शांत, थोडं संयमी, थोडं स्थितप्रज्ञ बनवा. तेवढंच पुरेसं आहे.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts
Inspired by The Daily Stoic by Ryan Holiday, तसेच 25 + वर्षांचा senior clinical practice चा अनुभव.