Just For Hearts

Liver Health

Sugar Control Improved but Fatty Liver Remains: Why?

Dr Ravindra L Kulkarni2 min read
Sugar Control Improved but Fatty Liver Remains: Why?

Sugar control सुधारलं… पण Fatty Liver तसंच! असं का? 🤔

“डॉक्टर, माझं HbA1c आधी 8.2 होतं, आता 6.5 झालं. Sugar छान control मध्ये आहे. पण Sonography मध्ये अजूनही Grade 2 Fatty Liver दिसतंय. मग नेमकं सुधारलं काय?”

हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

कारण Blood Sugar सुधारली म्हणजे संपूर्ण Metabolic Health सुधारलीच, असं नाही!

आपल्या शरीरात Sugar control, Insulin Resistance, Visceral Fat आणि Liver Fat या एकमेकांशी जोडलेल्या, पण वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत.

चला, थोडं खोलात समजून घेऊया.

1️⃣ HbA1c सुधारलं… पण Insulin Resistance?

औषधं, आहारातील बदल किंवा वजन कमी झाल्यामुळे रक्तातील Sugar सुधारू शकते.

पण शरीराला अजूनही जास्त Insulin लागत असेल, तर Metabolic Dysfunction पूर्णपणे सुधारलेलं असेलच असं नाही.

विशेषतः पोटाभोवतीची चरबी आणि Liver मधील Fat वेगळ्या गतीने कमी होऊ शकतात.

2️⃣ Liver हा फक्त Sugar साठवणारा अवयव नाही!

Liver मध्ये Fat तीन प्रमुख मार्गांनी जमा होतं.

🔹 शरीरातील Fat Tissue मधून येणारे Fatty Acids

🔹 जास्त ऊर्जा, विशेषतः अतिरिक्त Calories आणि काही Carbohydrates पासून Liver मध्ये तयार होणारी चरबी

🔹 Liver मधून Fat बाहेर पाठवण्याची आणि वापरण्याची क्षमता

या प्रक्रियांमधील असंतुलन कायम असेल, तर Sugar सुधारूनही Liver Fat टिकू शकतं.

3️⃣ Weight कमी झालं का? Waist कमी झाली का?

हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न!

काही रुग्णांचं HbA1c कमी होतं, पण वजन आणि कंबरेचा घेर फारसा बदलत नाही.

अशावेळी Liver Fat कमी होण्यासाठी आवश्यक असलेले Metabolic Changes पुरेसे झाले नसण्याची शक्यता असते.

संशोधनानुसार, जास्त वजन असलेल्या Fatty Liver रुग्णांमध्ये सातत्याने सुमारे 5% वजन कमी झाल्यास Liver Fat कमी होण्यास मदत होते. 7–10% वजन घटल्यास Liver Inflammation मध्येही अधिक सुधारणा दिसू शकते.

4️⃣ Sonography अजूनही Grade 2 दाखवतेय… म्हणजे काहीच सुधारणा नाही?

तसंही नाही!

Sonography मधील Grade 1, 2, 3 ही ढोबळ वर्गवारी आहे. Liver Fat मधील लहान बदल त्यात नेहमी स्पष्ट दिसतीलच असं नाही.

आणि महत्त्वाचं म्हणजे

Fatty Liver चा Grade आणि Liver Fibrosis (यकृताला आलेली जखम/कडकपणा) हे एकच नाहीत.

ALT/SGPT Normal असलं तरी काही रुग्णांमध्ये Fibrosis असू शकतो.

म्हणून Diabetes, Obesity किंवा इतर Metabolic Risk असलेल्या रुग्णांमध्ये गरजेनुसार FIB-4 Score आणि FibroScan वापरून Fibrosis Risk तपासणं महत्त्वाचं ठरतं.

मग आता नेमकं काय करायचं? 🎯

✅ HbA1c बरोबर Waist आणि Weight चा Trend पाहा. फक्त एक रिपोर्ट नाही, मागील 3–6 महिन्यांतील बदल तपासा.

✅ Diet मध्ये Calories आणि Quality दोन्ही तपासा. गोड पेयं, अतिरिक्त Calories, Refined Carbs आणि Saturated Fat कमी करा.

✅ Aerobic Activity + Strength Training दोन्ही ठेवा. Muscle Health सुधारल्याने Metabolic Health ला मदत होते.

✅ Liver चा Risk स्वतंत्रपणे तपासा. विशेषतः Diabetes अनेक वर्षांपासून असेल, तर Sugar चांगली असूनही Liver Assessment दुर्लक्षित करू नका.

❤️ आजचा Just For Hearts नियम

Sugar Control हा एक चांगला Report आहे. पण Metabolic Recovery ही अनेक अवयवांमध्ये घडणारी प्रक्रिया आहे.

एका आकड्यात झालेली सुधारणा म्हणजे संपूर्ण शरीरातील सुधारणा नव्हे.

Observe the Pattern. Change the Course.

आपल्या Just For Hearts App मध्ये HbA1c, Weight, Waist आणि Lifestyle Trends एकत्र नोंदवत राहा.

कारण एकाच Report पेक्षा अनेक महिन्यांत दिसणारा Pattern अधिक उपयुक्त ठरतो. Liver ची वैद्यकीय तपासणी मात्र स्वतंत्रपणे आवश्यक आहे.

Sugar सुधारली, पण Fatty Liver कायम आहे? तुमच्या Reports मधील बदलांचा अर्थ समजून घ्यायचा असल्यास

📱 JFH ONE: 92097 42597 WhatsApp Chat Only. प्रश्न विचारा. योग्य पुढची पायरी आम्ही सांगू.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB FSCAI Cardiology Senior Consultant Physician & Cardiologist Specialist in CardioMetabolic Diseases

#fatty-liver#sugar-control#metabolic-health#diabetes#insulin-resistance#weight-loss#liver-health
Share:WhatsAppXFacebook