खूप अशक्त वाटत होतं म्हणून डॉक्टर कडे गेलो होतो. अमुक ऑपरेशन होतं म्हणून टेस्ट केल्या, त्यात शुगर आहे असं कळलं.
शुगर किंवा मधुमेह या मध्ये बरेच वेळा काही लक्षणं दिसून येत नाही, आणि कधी कधी आपल्या धावपळीच्या जीवनात काही serious न वाटणारी लक्षणे जसं थकवा येणे, सतत तहान लागणे, किंव्हा मानेवर काळा पॅच दिसणे etc. अश्या गोष्टी बरच वेळा neglect केल्या जातात.

बराच काळ ही शुगर कमी जास्त होत असते व शरीराला आतून इजा करत असते.

म्हणून Diabetes ला silent killer म्हटले आहे. खूप काळ तो asymptomatic असू शकतो आणि नंतर मात्र गंभीर रुपात बाहेर येण्याची शक्यता असते.

कालच एका 63 वर्षाच्या आजोबांना counselling करताना ही गोष्ट लक्षात आली. त्यांना डोळ्याचे ऑपरेशन करायचे म्हणून सगळ्या टेस्ट केल्या त्यात शुगर खूप वाढलेली होती, तेव्हाच कळले होते Diabetes आहे. HbA1c – 11 होती.आणि heart माध्ये 80% ब्लॉक्स.
त्यांना वरून काहीच त्रास नव्हता अगदी नीट routine चालू होते.

त्या आजोबांचे ऑपरेशन च्या निमित्ताने सगळे चेकिंग झाले आणि अनर्थ टळला.

सगळ्यांनाच ही संधी मिळेल असं नाही.

आपल्या body कडे लक्ष देणे. काही वेगळे वाटल्यास तज्ज्ञांकडून सल्ला घेणे गरजेचे आहे. खास करून जे लोक जाड असतील व ज्यांच्या घरात diabetes ची family history आहे त्यांनी विशेष लक्ष देणे.

रामबाण उपाय म्हणजे ‘prevention’.

एकदा तिशी ओलांडली की दर ६ महिन्याने शुगर टेस्ट करणे गरजेचे आहे व basic check up.

Diabetes झाला तरी त्याला घाबरु नका. योग्य सल्ला घेऊन तो नीट manage करता येतो.

नक्कीच तुम्ही पण तुमच्या आसपास अशा गोष्टी ऐकल्या असतील?

नेहा काटेकर
Just For Hearts
An Initiative for Healthy Life

#SugarStories
#HealThyLife
#JustForHearts