Corona patient च counselling करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली .
दुसऱ्या लाटे मध्ये खूप जवळ ची माणसं आपण गमावली. हो ना ?
असाच दुसऱ्या लाटेमध्ये मला मित्रपरिवारामधून एकाचा फोन आला.
आहार तज्ञ असल्या मुळे लोक आधी नाही तरी अशा वेळेला नक्की call करतात व काय खायचे हे विचारतात. ( आधी काय खाऊ नये हे विचारले असते तर नक्कीच ही वेळ आली नसती)
तर covid + आणि uncontrolled Diabetes असल्या मुळे हॉस्पिटल ला admit केले.
आधीच शुगर ३५० – ५०० आसपास होती. आता या condition ला कितीही चांगली आहार तज्ञ आणली तरी काय फायदा.
यांना मी २ महिन्या पूर्वी भेटले होते आणि आमची आहाराविषयी चर्चा झाली होती, पण कसा आहे, ते IT company मध्ये खूप मोठ्या पदावर कार्यरत होते आणि माणसापेक्षा machine वर social media or Google यावर जास्त विश्वास.
आमची चर्चा म्हणजे तेच मला Diabetes, weight loss बद्दल कुठे काय प्रॉडक्ट्स आहे आणि कसे त्यांची company मोठे हॉस्पिटल्स ला treatment देते आणि कसे ते सकाळी powder घेतात ज्याने शुगर कमी होते असं सगळं सांगत होते.
Advertisement इतक्या प्रभावी आहेत की हल्ली लोक तज्ञांचा सल्ला सुद्धा टाळतात.
खूप दुःखाची गोष्टी आहे की ते आज आमच्यात नाहीत.
ते हॉस्पिटल टाळू शकले असते जर त्यांची शुगर कंट्रोल मध्ये असती तर.
मला खूप प्रश्न पडतो की आपण २०० – ५०० रुपये कुठेही खर्च करतो पण जेव्हा डॉक्टर किंव्हा आहार तज्ञांचा / Diabetes educator चा सल्ला घेण्याची वेळ येते तेव्हा हे खूप वाटतात.
पण हॉस्पिटल चे लाखाचे बिल भरताना खूप कौतुकाने सांगतात.
असो !
पण तिसरी लाट पण अटळ आहे. तर आपण ठरवले पाहिजे preventive care घ्यायची का नंतर त्रास सहन करायचा.
नेहा काटेकर
Just For Hearts
An Initiative for Healthy Life