साहित्य- पाव किलो (२५० ग्राम,१ मोठे) रताळे, २ मिरच्या छोटे तुकडे करून, १ चमचा तेल / तूप,
अर्धा छोटा चमचा जीरे,१ छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ, २ मोठे चमचे दाण्याचे कूट, १ चमचा
खोवलेले खोबरे
कृती-
१) रताळी चांगली धुवून, सालासकटच किसून वापरा. नुसता रताळ्याचा कीस केला तर तो चिकट
होतो त्यामुळे त्यात बटाटा घालावा किंवा रताळे किसून किमान दोन तास थंड पाण्यात भिजवून ठेवावे.
२) पॅनमध्ये तूप/तेल गरम करण्यास ठेवावे. तूप गरम झाल्यावर त्यात जीरे आणि मिरच्यांचे तुकडे
टाकावेत लगेच रताळ्याचा किस टाकावा. चवीनुसार मीठ घालावे. सगळे पदार्थ चांगले मिक्स करून ५-
१० मिनटे झाकण ठेवून स्लो गॅसवर शिजू द्यावे.
३) नंतर झाकण काढून त्यात दाण्याचे कूट, साखर आणि नारळाचा चव घालून हळूहळू मिक्स करावे
परत झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. दोन मिनिटांनी झाकण काढून गरमागरम खावू शकता.

*वाढणी: २-३ जणांसाठी

Rupali Udhane