महाराष्ट्र बंद ची बातमी आली त्या रात्रीच माझ्या weekend yoga class च्या मेंबर्सना क्लासला सुट्टी असल्याचे मी सांगितले. नंतर तर अखंड देशच lockdown मध्ये असल्याचे जाहीर झाले. 14 एप्रिल, पुढे तर 3 मे आणि नंतरही कधी संपेल हे निश्चित माहीत नव्हते.

Corona virus वर सध्या तरी कोणतेही औषध नाही, आपल्या हातात एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपली रोगप्रतिकारकशक्ती (immunity) वाढवणे. एक आहारतज्ञ योग्य शिक्षिका या नात्याने मी विचार केला, immunity वाढवायची तर समतोल आहार योगाभ्यास दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मी तर ह्याच क्षेत्रात काम करते. माझेही विचारचक्र सुरू झाले. प्रत्यक्ष समोरासमोर योगा शिकवणारी मी, online क्लास कसा घेऊ शकेन? हळूहळू मला एकएक कल्पना सुचत गेल्या. what’s app वर माझे आसनाचे video, photo, रोजच्या आसनाचा set design करून पाठवणे, प्रत्यक्ष फोन वर बोलणे, त्यांना प्रोत्साहन देणे इत्यादी. अश्या अनेक युक्त्यांनी माझा क्लास छान सुरू झाला. आता मेंबर्स ने पण छान response द्यायला सुरवात केली. त्यांचे मला आलेले feedback पण खूप बोलके होते.

Online diet consultation करताना तर वेगळाच अनुभव आला. lockdown मुळे भाज्या, फळे, diet food मिळत नाही मॅडम.’ असा सूर काही जणांकडून लावला गेला. पण स्वयंपाकघरात तर रोज प्रयोग होत होते! म्हणजे आज काय cake, bread pizza, burger, जिलेबी,अजून काय काय विचारू नका. याने वजन वाढणार नाही तर काय?! काहींनी तर कामाचा खूप load आहे म्हणून जेवणाला फक्त maggi बनवून खाल्ली. अशा वेळेला मात्र counselling ला फारच efforts लागले. तर व्यायाम करण्याचे कारण एरवी असतेच पण आता काय तर ‘work from home मुळे routine राहिले नाहीमग व्यायामा ला वेळच नाही. अशी एक ना अनेक कारणे समोर येऊ लागली.

पण एखादी गोष्ट ठरवली तर अनेक संकटावर मात करता येते. यावर मी त्यांना सुचवले,

सध्या योग्य homemade food हेच तुमचे diet food आहे. थोडे नीट नियोजन केले तर उपलब्ध साहित्यात सुद्धा समतोल आहार घेता येऊ शकतो.

एरवी weekend hoteling, नाहीतर बाहेरून, zomato, swiggy parcel, party function, celebration, सण, अजून काय काय यामुळे घरचे जेवण कमी बाहेरचेच खाणे जास्त होत होते. पण आता या सर्वांना पूर्ण फाटा मिळाला. सध्या Travelling time वाचतोय. घरची कामे वाढली आहेत पण time management आणि घरच्या सदस्यांची मदत घेऊन ती सुद्धा छान manage करता येऊ शकतात. थोडक्यात (स्वानुभवावरून) एरवी ऑफिसमुळे वेळ मिळत नाही अशी कारणे देणाऱ्यांना व्यायाम हा रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे हे पटवण्यात करायला लावण्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झाले!

मला असे वाटते ज्यांचे वजन जास्त आहे अशांना जन कमी करण्याची lockdown ही उत्तम संधी आहे.

कारण बाहेरचे खाणे पूर्ण बंद आहे घरी काय बनवून खावे काय व्यायाम करावा याचा योग्य सल्ला घेऊन पालन केले तर lockdown नंतर तुमचे एक नवीन रूप लोकांसमोर येईल.

Social media फारशी वापरणारी मी तो या काळात बराच पण नक्कीच चांगल्या कारणासाठी वापरायला लागले. म्हणतात ना गरज ही शोधाची जननी आहे. ही माझी lockdown मधील माझ्या profession बद्दलची positive side. माझ्या स्वतः च्या बाबतीत म्हणायचे तर मी ह्या संपूर्ण lockdown कडे एक सकारात्मकतेने बघते. रवी किती तरी गोष्टी करायच्या असतात पण वेळे अभावी करता येत नाही. मला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग म्हणजे मी सध्या YCB level-3 (yoga certification board) चा अभ्यास करते आहे त्यामुळे पुन्हा एकदा पतंजली योगसूत्र, गीता तसेच इतर यौगिक ग्रंथ यांचा अभ्यास होतो आहे. Online गाणे, key board, संस्कृत ह्या पण गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वेगवेगळे webinar attend करत आहे.

रोजचे विपश्यना ध्यान, योगासनाचा सराव, प्राणायाम हे आधीही करत होते पण आता अजून जास्त वेळ देऊन करता येते. तसेच नियमित अग्निहोत्र जे की कामामुळे कधीतरीच व्ह्यायचे ते आता नियमितपणे होऊ लागले आहे. एरवी कामानिमित्त बाहेर जाताना मी बरी दिसतेय ना हे बघण्यासाठी आरश्यात डोकवावे लागत होते. पण मिळालेल्या वेळेमुळे आपल्या आतल्या आरश्यात डोकवायला जास्त वेळ मिळायला लागला आहे! Lockdown चा अजून एक फायदा म्हणजे माझा IIT Madras ला असणारा मुलगा आता घरी असल्याने त्याच्या कडून योगासन चा सराव करून घेता येत आहे! ह्या काळात माझा संपूर्ण दिवस positively व्यस्त आहे. वेळ जात नाही असा अनुभव येता उलट मला वेळ मिळत नाही हे जाणवत आहे.

एका अभूतपूर्व अनुभवातून आपण सर्वच जण जात आहोत. बाहेरील परिस्थिती, जगात जे चालले आहे, वाढते मृताचे आकडे,

हे corona संकट गेल्यानंतर भविष्यातील आर्थिक संकट ह्या सर्वामुळे कुठेतरी एक माणूस म्हणून नक्कीच मनात भीती, चिंता, नकारात्मकता वाढायला लागली आहे. मी पण अपवाद नाही. पण प्राप्त परिस्थिती स्वीकारणे, वर्तमान जगताना भविष्याची चिंता करता जमेल तसे नियोजन करण्यास मला विपश्यना ध्यान योगाभ्यास शिकवते आहे.

परवाच एकांशी फोनवर बोलत होते. ते तिकडून म्हणाले सर्व एकदा कधी normal ला येईल माहीत नाही. फोन ठेवल्यावर मनात विचार केला की normal म्हणजे नक्की काय? आता जे चालले आहे ते normal आहे का की हे सर्व संपल्यावर normal होईल? असो मला माझ्या कार्यक्षेत्रामुळे लोकांचे शारीरिक, मानसिक भावनिक आरोग्य चांगले राहाण्यासाठी मदत करायची संधी मिळते आहे याचे मला समाधान आहे.

माझ्या योगा क्लास च्या शेवटी आम्ही प्रार्थना म्हणतो, ती मला आता पुन्हा म्हणावीशी वाटते,

सर्वे भवन्तु सुखिनः।

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु।

मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

शान्तिः शान्तिः शान्तिः॥