18 दिवसांच्या घनघोर युद्धांनंतर माता गांधारी पुत्र वियोगाने कुरुक्षेत्रावर दुःखांत बसलेली असते

आपल्या सर्व मुलांचा मृत्युचे दु:ख सहन करण्यापलीकडे

त्यांच्या मनामधुन काही केल्या हे विचार जात नसतात

भगवान श्रीकृष्ण मातेचे सांत्वन करण्यासाठी तिथे येतात

सर्व काही टाळतां येण्यासारखे असताना ही कृष्णा ने महाभारतकालीन युद्ध टाळले नाही ह्याचा राग मातेच्या मनामध्ये असतोच

कृष्णाने समजावून ही माता दुःखांमध्ये कुरुक्षेत्रवर न खाता पिता बसलेली असते

मनातून विचार काही जात नसतात

अनेक दिवस जातात

एका दिवशी भुकेने व्याकुळ माता गांधारी अन्नाच्या शोधात फळी शोधले व खाते

अचानक मातेला लक्षात येते की आपले अतीव दुःख भुखेच्या पीडेमुळे आपण काही काळ विसरलो तसेच अन्न ग्रहण केले

तिला लक्षात येते का ही सगळी कृष्णाची माया आहे

आधीच रागावलेली माता मग कृष्णाला शाप देते की येणाऱ्या 32 वर्षांनंतर तुझ्या संपुर्ण कुळाचा नाश होईल

कृष्ण त्यांवर काही प्रतिक्रिया देत नाही

त्याला ही माहीत असते द्वापार युग संपून कलियुगाची वेळ जवळ आली आहे

ह्यातुन एक बोध मात्र असा आहे की माणसाला किती ही मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागले तरी भविष्यातील त्यापेक्षा अधीक तीव्र दुःख किंवा अधिक आनंद , त्या माणसाला ते दुःख विसरावयाला मदत करते

Time heals

COVID महामारी मध्ये पण अनेक लोकांना आपल्या प्रिय व्यक्तींच्या मृत्युचे दुःख आहे मग ते आई असो अथवा वडील , पती , पत्नी , मुले

काळ हे च ह्या दुःखांचे निवारण करेल

न भरून येणारे हे दुःख सहन करणे हे सर्वांच्या आवाक्याबाहेर चे आहे

COVID बरोबर च आता mucormycosis , black fungus , white fungus अश्यांची चर्चा आपण ऐकतो

ते स्वभाविक आहे , त्यात business पण आहे , media पण तेच दाखवणार

पण ऐक गोष्ट जी discuss केली जात नाही ती म्हणजे आपल्या माणसांच्या जाण्याची दुःखामधुन सावरण्याची मदत

Grief Management

येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षीत तज्ञ Psychologist / Psychiatrist ह्यांची तसेच उत्तम मित्र परिवाराची गरज मोठ्याप्रमाणा मध्ये लागणार हे नक्की

Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI

#coviddiaries
#grief
#counselling
#JustForHearts