Cytomegalo Virus ज्याला CMV असे commonly संबोधले जाते त्या बद्दल थोडक्यात

Mucormycosis नंतर आता ह्याची चर्चा असेल

खरे तर AIDS patients म्हणजे च ज्यांची प्रतिकार शक्ती खुप च खालावली आहे त्याच्या मध्ये आढळणारा आजार

पण आता Critical / Severe COVID रुग्णांमध्ये ह्या cases पण आढळून येत आहेत

हा आजार तसा sexually transmitted प्रकारातला. पण त्या बरोबर च Saliva / लाळ , Tears / अश्रु , urine , endotracheal secreations ( ventilator वर असलेल्या patients मधील ) , breast milk ह्या द्वारे पसरतो आजार

मुख्यत्वे करुन मेंदु , डोळे , अन्ननलिका , Lungs 🫁 , मोठे आतडे / colon , Liver इ मध्ये ह्याची लक्षणे आढळतात

Encephalitis , Retinitis , Oesophagitis
Colitis
Abdominal distension etc

पण ह्या बरोबर च शरीरातील इतर अवयवांना पण ह्याची बांधायचे होते

ताप , बेशुद्धपणा , दृष्टीमध्ये बदल , अन्न गिळताना त्रास , जुलाब / loose motions , abdominal distension , फिटस , pre- coma अशी अनेक लक्षणे दिसुन येतात

CMV antibody , CT Scan ( मेंदु तसेच पोटाचा , लक्षणांनुसार ) निदाना साठी केले जाते

निदान झाल्यावर ही specific treatment सध्या available नाही
काही antiviral drugs ( ganclicovir सारखी ) उपलब्ध आहेत व आजाराच्या तीव्रतेनुसार वापरली जातात

COVID रुग्णामध्ये ह्याचे प्रमाण वाढत असल्याने त्याच्या संपर्कात येणारे नातेवाईक , nursing / paramedic / drs नी विशेष काळजी घेतली पाहीजे

त्यांचा संपर्क जेवण देणे , अर्धे राहीलेल्या plates , urines , oral secretions शी येत असल्याने काळजी घेणे आवश्यक

Gloves / face shield / goggles वापरणे उत्तम

Good plates पण कमी हाताळले पाहीजे. Prefer disposable plates व त्याची योग्य विल्हेवाट आवश्यक

( Hospitals मध्ये Bio Medical Waste manage करण्याची एक प्रक्रिया असते )

हा virus बराच काळ शरीरातील पेशींमध्ये / secretions मध्ये राहु शकतो

Mild Covid रुग्णांनी व family members ने ह्याची काळजी करु नये

Serious COVID cases , खुप दिवसांपासुन ICU मधील patients , Steroids / COVID उपचारांमुळे कमी झालेली immunity अशा patients ला च ह्याची बांधा होते

बऱ्याच वेळेस खालावत चाललेली प्रकृती , explain न होणारा बेशुद्धपणा , fibrosis नसताना ही घसरत चाललेली Lungs 🫁 ची कार्यक्षमता , दम कमी न होणे , ताप कमी न होणे ह्यामागे COVID बरोबर CMV infections पण असु शकते

ICU Team साठी पण ह्या cases चे वाढते प्रमाण चिंता वाढवणारे आहे

Biomedical waste manage करण्याबरोबर च patinets चे urines तसेच hospital मधील सांडपाणी ( sevage ) manage करणे हे पण government / healthcare authorities साठी भविष्यातील एक challenge असणार आहे

आशा आहे ही माहीती आपल्याला उपयुक्त ठरेल

मित्र परिवारा सोबत share करायला विसरु नका

काळजी घ्या

Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI

#coviddiaries
#cytomegalovirus
#treatment
#COVID
#HealThyLife
#JustForHearts