COVID आणि रक्तवाहीन्यांमधील गाठी ( clots / thrombosis ) ह्या विषयी थोडक्यात :

1 COVID patients मध्ये रक्तामधे clots / thrombosis चे प्रमाण significant आहे. heart attack / paralysis / venous thrombosis etc हे आजार ही वाढत आहेत च

2 ज्यांना खुप आधी COVID झाला होता / mild स्वरुपाचा आजार होता त्यांच्या मध्ये रक्तामध्ये clots / गाठी होण्याचे प्रमाण सांगणे अवघड आहे

3 Moderate ते Severe COVID आजारामध्ये 50% patients मध्ये clots / thrombosis च्या cases / complications आढळून येत आहेत

4 clots / thrombus होण्यामागे 2 कारणे असावीत असे research सांगते.

COVID Virus 🦠 पेक्षा शरीराचा infections ला दिलेला प्रतिसाद – Intense Inflammatory Response हा clots साठी कारणीभूत आहे ( COVID associated Coagulopathy )

5 एक मतप्रवाह असा ही आहे की COVID infections नंतर शरीरीमध्ये निर्माण झालेल्या auto antibodies मुळे पण हे clots व पुढील complications होतात.

Plasma therapy वापरु नये हे सांगण्यामागे हे पण एक कारण आहे

6 बैठी जीवनशैली / sedentary lifestyle , स्थूलता overweight , cancer तसेच 70 पेक्षा वर जास्त अशा COVID cases / recovered cases मध्ये ह्याचे प्रमाण जास्त आहे

7 Arteries / Veins दोन्ही मध्ये clots / thrombus आढळून येतात

8 IL6 , D Dimer , PT , Fibrinogen levels ( ह्या सर्व Lab / Blood Tests आहेत ) ज्या patients मध्ये वाढलेल्या असतात त्यांना ह्याचा धोका जास्त असतो

9 X Ray / CT Scan चांगला असुन ही जेव्हा Patients ची condition serious होते तेव्हा Lungs 🫁मधील रक्तवाहीन्यांमधील clots / thrombus हे एक कारण असु शकते. ( Pulmonary Thromboembolism PTE ). अनेकदा छातीत दुखणे , दम लागणे , sudden cardiac arrest ही लक्षणे असतात

10 Heart , Brain , अन्ननलिका ( आतडे intestine ) तसेच हात पायाच्या रक्तवाहीन्यांमध्ये पण clots / thrombosis आढळून येत आहे

11 Blood 🩸 thinner tablets ( aspirin ) तसेच Heparin ( LMWH ) ह्याचा treatment मध्ये वापर केला जातो.

जेवढे लवकर सुरु करू तेवढा धोका कमी

12 भरपुर पाणी ( good hydration ) , व्यायाम ( ambulation ) तसेच sugar , cholesterol तसेच वजना वर नियंत्रण हे पण हे टाळण्यासाठी आवश्यक

13 Moderate / Severe COVID आजारामध्ये हे complications टाळण्यासाठी discharge च्या वेळेस blood thinner tablets दिल्या जातात

Aspirin हे सर्वात commonly वापरले जाणारे औषध

14 किती दिवस हे औषध घ्यावे लागेल हे patients च्या COVID आजारावर ठरते

सरासरी 3 months ते 12 months पर्यंत हे औषध घ्यावे लागु शकते

ह्यामुळे रक्तातील clots , heart attack , paralysis तसेच इतर complications चा धोका टळतो

15 येत्या काही दिवसांमध्ये aspirin बरोबर Dipyridamole हे एक जुने औषध चर्चे मध्ये व वापरात येऊ शकते.

16 बऱ्याच वेळा COVID vaccine 💉 नंतर ही blood clots च्या cases आढळल्याच्या news आपण बघतो. पण ते प्रमाण मुळ आजाराच्या comparison मध्ये खुप च कमी

त्या भितीने vaccine 💉 घेण्याचे टाळणे चुकीचे आहे

COVID / Post COVID मध्ये वाढत असलेल्या Heart Attack / Paralysis / तसेच इतर complications ची भिती दुर होण्यास ह्या माहितीचा नक्की च फायदा होईल

गंभीर COVID आजारातून बरे झालेल्यांनी न घाबरतां Aspirin बरोबर नियमित व्यायाम , भरपुर पाणी , sugar / cholesterol / weight control मध्ये ठेवणे ह्या वर भर द्यावा

Post COVID काय तपासण्या कराच्या व कधी करायच्या हे next time च्या लेखामध्ये

काही प्रश्न असल्यास नक्की विचारा

मित्र मैत्रिणीं , family members ना ही माहीती अवश्य forward / share / tag करा

अशा लेखांसाठी Just For Hearts चा Telegram Channel अवश्य Join करा

Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI

Just For Hearts
An Initiative for Healthy Life

#Coviddiaries
#thrombus
#heart attack
#JustForHearts