हरभऱ्याची आमटी

साहित्य –

ओले हरभरे सोलून (१ वाटी)
लसूण ४-५ पाकळ्या
तीळ एक मोठा चमचा
हिरवी मिरची २
आलं पाव इंच
कोथिंबीर मूठभर
काळा मसाला १ छोटा चमचा
तिखट १ छोटा चमचा
फोडणीसाठी तेल, हिंग, जीरे मोहरी,हळद, कढीपत्ता
चवीनुसार मीठ

कृती – 

प्रथम कढईत एक चमचा तेल घेऊन त्यावर हरभरे किंचित परतून घ्या. त्याच तेलात नंतर तीळ, लसूण, हिरवी मिरची परतून घ्या. परतलेले सगळे पदार्थ आणि कोथिंबीर मिक्सर मध्ये वाटून घ्या. वाटताना पाणी घालावे पण अगदी पेस्ट करू नये, किंचित भरड चालेल.

आता कढईत एक डाव तेल गरम करा. त्यात मोहरी, जीरे घाला. मोहरी तडकल्यावर हिंग, कढीपत्ता घाला. त्यानंतर हळद, तिखट, काळा मसाला घालून किंचित परता. मग त्यात मिक्सर मधून काढलेलं वाटणं घालून परतावे. चवीनुसार मीठ आणि दीड पेला पाणी घालून खळाखळून उकळी आणावी. हरभऱ्याची आमटी तयार.

ही आमटी आणि बाजरीची भाकरी कुस्करून खाण्याची पद्धत आहे.

Team JFH