सारखं गोड खायची इच्छा होते? या ५ टिप्स वाचा! आपल्यापैकी अनेकांना सतत गोड खाण्याची इच्छा होते. विशेष करून जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावेसे वाटते. अशावेळी गुळाचा खडा, चॉकलेट, मिठाई असे पर्याय तोंडामध्ये टाकले जातात. पण थोडी थोडी करून अशी पोटात जाणारी साखर वजन वाढवू शकते. हे टाळण्यासाठी खालील ५ टिप्स तुम्हाला मदत करतील.

Check out my new article:

Check out my youtube channel:

सारखं गोड खायची इच्छा होते? या ५ टिप्स वाचा!

1. जेव्हा तुम्हाला गोड खावेसे वाटेल तेव्हा एक ग्लासभरून पाणी प्या. तुम्ही जे काम करत असाल त्यातून थोडी मोकळीक घ्या आणि ५ मिनिटे मोकळ्या हवेत चक्कर मारून या. कदाचित कंटाळा आल्यामुळे सुद्धा तुम्हाला गोड खावेसे वाटत असेल!

2. गोड खावेसे वाटेल तेव्हा साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा एखादे फळ किंवा सुकामेवा खा. यामुळे गोड खाल्ल्याचे समाधान तर मिळेलच पण पोटात अतिरिक्त उष्मांक जाणार नाहीत. शिवाय फळातुन जीवनसत्त्वे व तंतुमय पदार्थ देखील मिळतील.

3. गोड खावेसे वाटेल तेव्हा शुगर फ्री च्युईंग गम चघळा किंवा एखादी लवंग अथवा दालचिनीचा तुकडा चघळा. यामुळे गोड खायची इच्छा कमी होईल.

4. तुमचे जेवण वेळेवर घ्या. दोन खाण्यात खूप अंतर ठेवू नका. यामुळे खूप भूक लागणार नाही आणि गोड खायची इच्छा होणार नाही.

5. जर भूक नसतानाही तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुमचे लक्ष दुसरीकडे वळवा. काहीतरी वाचा, गाणे ऐका किंवा सरळ दात घासून या! यामुळे तुम्हाला काही खावेसे वाटणार नाही.