नवीन वर्ष म्हणजे आरोग्याबाबत वेगवेगळे संकल्प करण्याचा काळ! यातील बहुतांश संकल्प हे वजन कमी करण्याच्या बाबतीतले असतात!! वजन कमी करायचे म्हणजे वजन तपासणे ओघाने आलेच. पण वजन अचूकरित्या तपासणे हे म्हणावे तितके सोपे नाही. वजन तपासताना या ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर वजन योग्यरित्या तपासता येईल: तुमचे वजन तपासताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

Check out my new article:

तुमचे वजन तपासताना

1. सकाळी उठल्या उठल्या (शक्यतो पोट साफ झाल्यानंतर) वजन तपासा. यामुळे आपल्या अचूक वजनाची कल्पना देईल.

२. दर वेळी वजन तपासताना एकाच काट्यावर तपासा. वेगवेगळ्या काट्यांवर मोजलेल्या वजनांची तुलना करू नका. काटया-काट्यात फरक असू शकतो.

३. दरवेळी वजन तपासताना एकसारखे कपडे घाला. वजन तपासताना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातल्यामुळे (उदा. नाईटसूट घालणे आणि जीन्स पॅन्ट घालणे) वजनात बराच फरक पडू शकतो.

४. एका दिवसात अनेक वेळा वजन तपासू नका. वरील तीन बाबींचा विचार करुन आठवड्यातून एकदाच आपले वजन तपासा आणि त्याची नोंद ठेवा.

५. जर वजन तपासून तुमची काळजी वाढत असेल तर सारखे वजन तपासू नका. वजन हा एक आकडा आहे; ते अंतिम ध्येय नाही. नियमित व्यायाम आणि समतोल आहाराचे वजन नियंत्रणाव्यतिरिक्त अनेक फायदे आहेत हे विसरू नका.

Check out my youtube channel: