मार्च गेलाएप्रिलही गेला पण लॉकडाउन काही संपेनासर्वांनाच इच्छा नसूनही घरी होमकॉरंटाईन राहावे लागत आहेयाअगोदरच्या काळात सर्वांना श्वासही घ्यायलाही वेळ कमी पडत होता! लॉकडाऊनमुळे सर्वांचेच दैनंदिन जीवन आता बदलले आहेजो वेळ मिळतो आहे तो सर्वांना नकोसा झाला आहे.  घरातच राहणेबाहेर जाण्यावर बंधने यामुळे सर्वांना शारीरिक त्रास (वजन वाढणे) तसेच मानसिक त्रासही (ताणतणावचिडचिडमूड स्विंगजझोप  लागणेजाणवायला लागले आहेत. मी स्वतः एक हेल्थ केअर प्रोफेशनल असल्याने नेहमी सर्वांना रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासोबतच प्रकृतीप्रमाणे संतुलित आहार घ्यायचा सल्ला देते. मीच काय तर संपूर्ण मीडियाफेसबुक, ट्विटरव्हॉट्सअप सारख्या माध्यमातून सगळीकडेच संतुलित आहार (बॅलन्स डायट)घेण्याचे संगितले जात आहेशरीर प्रकृती सुदृढ राहण्यासाठी संतुलित आहारव्यायाम आवश्यक आहे. तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान (Meditation) करणेही तेवढेच आवश्यक आहे.

ध्यान’ म्हटले की सर्वांच्या मनात अगोदरच नकारात्मक विचार यायला लागतात. ’हे आपल्याला जमणारच नाहीशिकायला जास्त वेळ लागेलवेळ मिळत नाहीवगैरे वगैरेपण हीच खरी वेळ आहे जेव्हा आपण ध्यान शिकू शकतोध्यानाचा चा संबंध कुठल्याही जातीधर्म किंवा वयाशी नसतोलोकांना जेवढे वाटते तेवढे ध्यान करणे कठीणही नाही.

मग ध्यान म्हणजे नेमकं काय?

ध्यान म्हणजे मनाला शांतस्थायी करण्याची क्रिया आहेही क्रिया केवळ आध्यात्मिकतेसोबतच जोडलेली नाही तर विज्ञानासोबतही जोडलेली आहेआध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर या क्रियेने मनाला शांती मिळते आणि व्यक्ति मानसिक तणावमुक्त होतेवैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर ध्यानाने शरीरात सेरोटोनिन (मूड बॅलेंसिंग हार्मोन), ऑक्सीटोसिनग्रोथ हार्मोन आणि या सोबत सर्वच हार्मोन संतुलित होतात परिणाम स्वरूप व्यक्ती आनंदी राहायला लागते.

हल्ली या इंटरनेटच्या जगात एक गोष्ट फार चांगली आहेआपल्याला बाहेर जाऊन शिकण्याची काहीही गरज नाही आहेआपण इंटरनेट चा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने घरीच ध्यान शिकायला सुरुवात करू शकतो.

ध्यानचे प्रकार

मार्गदर्शन ध्यान (Guided Meditation)

मंत्र ध्यान

श्वास ध्यान (Breathing Meditation)

सुदर्शन क्रिया

 

ध्यान कसे करावे?

❖▪स्वच्छसोयिस्करठराविक जागाआणि वेळ निश्चित कराध्यान करतांनी कुठल्याही प्रकारची घाई नसावी. सकाळची किंवा संध्याकाळची वेळ कधीही उत्तम.

❖▪बसतांना पाठीचा कणा सरळ ठेवून बसावेमान आणि खांदे सैल सोडावे.

❖▪ध्यान क्रिया पूर्ण होईपर्यंत डोळे बंद असावेत.

❖▪ध्यान खाली स्थिर बसून करणे योग्य आहेपण जर तुम्ही ऑफिस मध्ये असाल तर खुर्ची वर बसूनही करू शकता.

❖▪ध्यान करतांना एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी की खूप पोट भरलेले नसावे. नाहीतर ध्यान करताना झोप लागू शकते.

❖▪ध्यानास बसलेल्या जागी शांतता असायला हवीगोंधळ नसावामोबाईल सायलेंट करून ठेवावा.

❖▪ध्यानाची सुरुवात 5 मिनिटे, 10 मिनिटांनी हळूहळू 30 मिनिटे करावीप्रत्येकांनी ध्यानाची वेळ आपल्या क्षमतेनुसार ठरवावी.

❖▪ध्यान पूर्ण झाल्यानंतर लगेच उठू नयेथोडा वेळ थांबून मग दुसर्या कामाची सुरुवात करावी.

ध्यानाचे  फायदे 

तणाव कमी होतो.

एकाग्रता (Concentration ) वाढते.

मन शांत होते

ध्यानाचे अजूनही असंख्य फायदे आहेत. ध्यानामुळे हळूहळू मन स्थिर व्हायला लागते. आपण जसजसे ध्यान करायला लागतो तसे प्रत्येकाला त्याचे सकारात्मक परिणाम जाणवायला लागतात..

 

सध्या दर 20 मिनीटांनी आपण हँड हायजिनची काळजी तर घेतच आहोतत्यासोबत दिवसातला काही वेळमेंटल हायजिनसाठी देऊया! चला कोरोनाशी लढूया!!