न्युट्रिशन च्या जगात पाऊल ज्यांच्यामुळे ठेवलं,

अनोळखी जग ओळखीच करुन दिलं.

पहिल्याच भेटीत जिने आपलस केलं, जणु ही जुनी सखीच भासली!

 

कधी आई म्हणुन, कधी मैत्रीण म्हणुन तर कधी शिक्षिका बनुन जी पाठीशी उभी राहीली,

ती फक्त आणि फक्त माझी मार्गदर्शिका होती!

 

नेहमीच जी फुल-ऑन  एनर्जी ने भेट्ते, कठीण काम अगदी सोप्प करुन सांगते,

माझ्यातला आत्मविश्वास द्विगुणित करते, सतत मला यशाचे धडे ती देते.

राहणी तिची साधी, बोली अगदी प्रेमळ, परक्यानाही करते बोली भाषेने जवळ!

 

आज मी जी ही घडले ते त्यांच्याच मुळे आहे, माझ्या यशाचे सारे श्रेय त्यांनाच आहे.

छोटीशी मुर्ती महान त्यांची किर्ती, जगाला सांगावी वाटते त्यांची महती.

 

हसऱ्या मुखाच्या, शांत आणि संयमी स्वभावाच्या माझ्या “कविता बक्षी” मॅडम

त्या एकच… 

त्यांच्या सारखी दुसरी होणे नाही, न्युट्रिशन जगतात अशी न्युट्रिपुर्णा परत घडणे नाही!!