बद्धकोष्ठता ही प्रौढांमध्ये नेहमीच दिसून येणारी समस्या आहे. बद्धकोष्ठतेकडे वेळीच लक्ष न दिल्यास मूळव्याधीसरखे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. बद्धकोष्ठतेच्या उपचारांमध्ये आणि बद्धकोष्ठतेचा प्रतिबंध करण्यामध्ये आहाराचा मोठा वाटा आहे. आहारातील खालील पाच पदार्थ तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवण्यास मदत करतील.

Check out my new article:

1. फळे आणि भाज्या: बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहारात तंतूमय पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आसते. तंतूमय पदार्थ पोट साफ ठेवायला मदत करतात. पण अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेत भाज्या-फळांमधील तंतूमय पदार्थ नष्ट होतात. म्हणून रोजच्या आहारात कच्ची फळे व कच्च्या भाज्या (कोशिंबीरी) यांचा समावेश करणे (दररोज कमीतकमी 3 वाट्या) महत्वाचे आहे. याचबरोबर सुके अंजीर, काळे मनुके यासारखे पदार्थ देखील बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. यांत तंतूमय पदार्थांबरोबरच ‘सॉरबिटोल’ नावाचा घटक असतो जो पोट साफ ठेवायला मदत करतो.

2. सालासकट धान्ये: सालासकट गहू, हातसडीचा तांदूळ, रोल्ड ओट्स, बाजरी, ज्वारी, नाचणी यासारखे पदार्थ आपल्या आहारात भरपूर तंतूमय पदार्थ देतात. पांढरे तांदूळ आणि मैदा यासारखे पदार्थ टाळून प्रक्रिया न केलेली धान्ये आहारात वापरली पाहिजेत.

3. बिन्स आणि मोडाची कडधान्ये: दररोज एक कप बिन्स किंवा मोडाची कडधान्ये कच्च्या भाज्यांपेक्षा दुप्पट तंतूमय पदार्थ देऊ शकतात. हे पदार्थ आहारात नियमितपणे घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

Check out my youtube channel:

4. दही आणि ताक: ही उत्पादने त्यातील उपयुक्त बॅक्टेरियांमुळे पचन प्रक्रियेस मदत करतात आणि बद्धकोष्ठता दूर करतात.

5. पाणी: बद्धकोष्ठतेच्या दृष्टीने पाणी म्हणजे बर्‍याचदा दुर्लक्षित झालेले परंतु अत्यंत महत्त्वाचे असे पोषक तत्व! बद्धकोष्ठता टाळण्यासाठी वरील सर्व पदार्थांसह आहारात भरपूर प्रमाणात पाणी असणे आवश्यक आहे.