तिळाची चटनी

आरोग्य दृष्टीकोन

या चटणी मधून आपल्याला फायबर ,विटामिन बी मिळते.
तसेच यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
आपल्या हाडांचे आरोग्य उत्तम राहतेआणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

 

 

1/2 कप तीळ
1 छोटा चमचा लाल तिखट
3 मोठे चमचे खोबरे
मीठ (चवीनुसार)

कृती

तीळ आणि खोबरे तव्यावर मिनिटभर भाजून घ्यावे.
गार झाल्यावर मिक्सर मधे भजलेले तीळ आणि तिखट एकत्र बारीक करुन घ्यावे.
नंतर त्यामध्ये खोबरे आणि मीठ घालून परत एकत्र बारीक करुन घ्यावे.
तुमची तिळाची चटणी तयार आहे.
तुम्ही या चटणी मधे हवे असल्यास आले आणि भाजलेले शेंगदाणे बारीक करुन घालू शकता ज्याने याची न्यूट्रीशन व्हॅल्यू वाढेल.

Team JFH