भारतीय आहारात पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्स) मुबलक प्रमाणात आढळून येतात. आपल्या रोजच्या आहारातील जवळजवळ 60 ते 75% भाग हा पिष्टमय पदार्थांनी बनला असतो.

पिष्टमय पदार्थांचे दोन मुख्य प्रकार आहेत – साधे आणि जटिल (कॉम्प्लेक्स). साधे पिष्टमय पदार्थ जलद गतीने पचतात आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात तर जटिल पिष्टमय पदार्थ पचनासाठी जास्त वेळ घेतात आणि रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात.

साध्या पिष्टमय पदार्थांचे स्त्रोत:
1. ग्लुकोज
2. साखर
3. गुळ
4. मध
5. दूध
6. फळे
7. जॅम, जेली, सिरप, साखरयुक्त पेये

जटिल पिष्टमय पदार्थांचे स्त्रोत
1. धान्ये
२.भाज्या
3. डाळी व कडधान्ये
4. कंदमुळे

पिष्टमय पदार्थांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे शरीराला विविध कामांसाठी ऊर्जा देणे.

अतिरिक्त पिष्टमय पदार्थ शरीरात ग्लायकोजेन आणि चरबीच्या रूपात साठवले जातात.

आपले वजन, चरबी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या आहारात या आवश्यक आहार घटकाचे योग्य प्रमाण ठेवणे आणि त्याचा योग्य तो प्रकार निवडणे फार महत्वाचे आहे.