घसा दुखत असताना हे ५ सोपे उपाय करून पहा, हिवाळा म्हणजे सर्दी, खोकला, घसा दुखणे हे नेहमीचेच. याचे नेहमीचे कारण म्हणजे जंतूसंसर्ग. बरे होण्यासाठी सर्वसाधारणपणे एक आठवडा लागतो. या काळात खालील सोपे उपाय घाशामधील वेदना आणि खवखव कमी करण्यास मदत करतील.
१. मीठ-हळदीच्या पाण्याच्या गुळण्या करणे:* १ ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद मिसळा. अशा पाण्याने दिवसातून २ ते ३ वेळा गुळण्या करा. यामुळे घशाला आराम मिळतो आणि घशातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास देखील मदत होते.
२. आले गवती चहाचा काढा घ्या:* किसलेले आले आणि गवती चहाची पाने पाण्यात घाला. त्यात लवंगा, दालचिनी आणि काळे मिरे कुटून घाला. हे मिश्रण उकळा आणि गाळून घोट घोट घ्या. यामुळे घश्याला त्वरित आराम मिळेल.
३. भाज्यांचे व चिकनचे सूप:* जेव्हा घसा खवखवत असतो तेव्हा बर्याच वेळा घट्ट अन्न गिळणे अवघड पडते. अशावेळी भाज्यांचे अथवा चिकनचे सूप घेतल्यास घशाला बरे वाटतेच पण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक सूक्ष्म पोषक घटकही पोटात जातात आणि तरतरी येते.
४. मध:* मधात बॅक्टेरिया विरोधात लढणारे गुणधर्म असतात. 1 कप गरम पाण्यात एक चमचा मध मिसळा आणि दिवसातून 2 ते 3 वेळा प्या. 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध देऊ नका.
५. पुरेशी विश्रांती घ्या:* घसा दुखत असताना पुरेशी विश्रांती घ्या. विश्रांती म्हणजे शरीराला आणि मुख्य म्हणजे घशाला (आवाजाला) विश्रांती द्या. आवश्यक असल्यास, झोपताना पलांगाचा डोक्याकडचा भाग थोडा वर करा म्हणजे रात्री खोकल्याची उबळ येणार नाही. लक्षात ठेवा – विश्रांती म्हणजे लवकर बरे होण्याचा उत्तम मार्ग!
MDM my father eatting throat pain and some time cough pls give suggestions