आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचे 5 सोपे मार्ग

सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त एक चमचा (5 ग्रॅम) मीठ खावे असे सांगितले जाते. परंतु आपल्यापैकी बहुतेक जण यापेक्षा खूप जास्त मीठ वापरतात. जास्त मीठाचे सेवन म्हणजे रक्तदाब वाढण्याची शक्यता! म्हणून फार उशीर होण्यापूर्वीच आहारातल्या मीठाचे प्रमाण कमी करणे श्रेयस्कर आहे!

आपल्या आहारातल्या मीठाचे प्रमाण कमी करण्यासाठी या 5 सोप्या टिप्स तुम्हाला मदत करतील:

Check out my new article:

१. आहारातील पॅकबंद पदार्थांचे सेवन कमी करा: असे आढळले आहे की रोजच्या मीठाच्या आवश्यकतेपैकी जवळपास ५०% मीठ आपल्या पोटात पॅकबंद पदार्थांमधून जाते. विशेषत: बेकरी उत्पादने, कॅन केलेले पदार्थ, पापड, लोणचे, तयार सूप्स, नूडल्स, चीज, जॅम, केचअप, चिप्स आणि क्रॅकर्स यासारख्या पदार्थांमध्ये मीठ आणि सोडियम भरपूर असते. म्हणून अशा पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवायला हवे. यासाठी पॅकबंद पदार्थांवरील फूड लेबल वाचणे आणि प्रत्येक सर्व्हिंगमध्ये 300 मिलीग्रामपेक्षा कमी सोडियम असलेले पदार्थ खरेदी महत्वाचे आहे.

२. आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा: ताजी फळे आणि भाज्या यांमध्ये नैसर्गिकरित्या सोडियम कमी असते. म्हणूनच रोजच्या आहारात त्यांचा समावेश प्रक्रिया न करता करायला हवा. यामुळे एकूण आहारातील सोडियमचे प्रमाण कमी होईल.

३. डायनिंग टेबलावर मीठ ठेवू नका: ताटामध्येही मीठ वाढणे टाळा. यामुळे आपल्या जेवणामध्ये अतिरिक्त मीठ घातले जाणार नाही.

Check out my youtube channel:

४. अनावश्यक मीठ खाऊ नका: बहुतेक लोक पोळ्यांची कणिक, भात, ताक, लिंबूपाणी, फळे, सॅलड अशा अनेक पदार्थांमध्ये मीठ घालतात ज्याची खरंतर अजिबात आवश्यकता नसते.  अन्नाच्या नैसर्गिक चवीचा आनंद घ्या!

५. मीठाला पर्यायी पदार्थांचा वापर करा: कोकम, लिंबाचा रस, व्हिनेगर सारख्या पर्याय आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्यास मदत करतील. पदार्थांची चव वाढवण्यासाठी मीठाऐवजी बारीक वाटलेली कोथिंबीर, मिरपूड, जिरे, कांदा पेस्ट, लसूण, आले यासारख्या मसाल्यांचा वापर करा.