उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरातून घामाच्या स्वरूपात भरपूर पाणी आणि क्षार बाहेर पडतात. हे बाहेर पडलेले पाणी आणि क्षार जर वेळीच भरून काढले नाहीत तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डिहायड्रेशन) होण्याची भिती असते.

उन्हाळ्यात आपल्याला तहानही भरपूर लागते. पण या काळात तहन लागली की बरेच जण सॉफ्ट ड्रिंक्स, सरबते यासारख्या गोड आणि सोडायुक्त पेयांचे सेवन करतात. यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे उन्हाळ्याच्या या काळात आहारातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात कोणत्या द्रवपदार्थांना प्राधान्य दिले पाहिजे आणि कोणते द्रवपदार्थ टाळले पहिजेत हे समजून घेणे आवश्यक आहे.

हे द्रवपदार्थ निवडा
1. पाणी
२. नारळपाणी
३. चिमूटभर काळे मीठ घातलेले लिंबूपाणी
४. जिर्‍याची पूड घातलेले कोकम पाणी (साखरेशिवाय)
५. सोलकढी
६. घरी बनविलेले भाज्यांचे ताजे सूप
७. भाज्यांची स्मूदी
८. ताजे ताक (चिमूटभर मीठ आणि जिरे पूड घालून)
९. जलजिरा
१०. टरबूज, कलिंगड यासारखी पाण्याचे प्रमाण जास्त असणारी फळे
११. हर्बल टी, ग्रीन टी
१२. डाळीचे पाणी, कांजी
१३. साखर न घातलेले दूध / मिल्कशेक

हे द्रवपदार्थ टाळा:
१. कार्बोनेटेड (सोडायुक्त) पेये, शीतपेये
२. गोड सरबते
३. नीरा
४. फळांचा रस (ज्यूस)
५. चहा, कॉफी
६. साखर घातलेली मिल्कशेक्स
७. अल्कोहोल युक्त पेये

By ©️Just For Hearts – your wellness partner
Dr. Ravindra L Kulkarni आणि Dr. Tejas Limaye यांच्या मार्गदर्शनाखाली दर मंगळवारी आरोग्य प्रबोधनपर माहिती प्रसिद्ध केली जाते.
ही माहिती तुमच्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका!

दर मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता आमच्या YouTube चॅनेल वर आमच्या तज्ञांचे आरोग्यविषयक लाईव्ह सेशन नक्की पहा. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेल ला जरूर सबस्क्राईब करा!

#Newsletter #HealThyLife #JustForHearts

Subscribe Our Channel Now