नाश्ता नंबर ७ & २२ - उब्जे आणि उकडपेंडी - Just for Hearts

Contact No. - Pune : 020 27293337, 65273337 (10AM - 8PM) | Delhi : 0120 6447663 (10AM- 8PM)

नाश्ता नंबर ७ & २२ – उब्जे आणि उकडपेंडी

Ukadpendi recipes | Dr Rupali Panse
सकाळी उशिराने जाग येणे, पोळ्या करणाऱ्या काकूंनी टप्पा देणे आणि बरोब्बर ६.४० am ला बिल्डिंग मधल्या मैत्रिणीने बेल वाजविणे , रुपाली कालची पोस्ट वाचून आज मुगाचे धिरडे केले डब्यासाठी. तुझ्या मुलांनाही डब्यात आज हेच दे आणि टेस्ट कर बरं कसे झाले. केलेली मदत पुण्यसंचिती असते आणि अडचणीच्या वेळी पुण्य कामी येते म्हणतात. हातातील गरम गरम चविष्ट धिरडे बघून पोस्ट लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटले :) :)
असो कालची पोस्ट ”नाश्ता २९”  नावाने खूप share झाली असे मला कळले . मनापासून सर्वांचे धन्यवाद. आलेले खूप फ़ोन messages आणि खूप मेल हि लिखाणाची सुखद पावती मिळाली. काल खूप जणांनी नाश्ता नंबर ७ आणि २२ बद्दल विचारले . ७ क्रमांक म्हणजे उब्जे आणि २२ म्हणजे उकडपेंडी होते .
दोहोंची थोडक्यात कृती देतेय .
नाश्ता नंबर ७.’उब्जे’: तांदळाच्या कण्या थोड्या तुपावर कोरड्या भाजून घेणे , करायच्या आधी अर्धा तास भिजत घालणे (नाही घातले तरी चालते ).
कढईत तेलाची मोहरी, जिरे, मेथ्या,कढीपत्ता, दाणे , खोबऱ्याचे तुकडे घालून फोडणी करणे त्यात कण्या घालून परतून चवीला मीठ साखर घालून पाणी टाकून शिजवणे. गरम गरम मोकळे दाणेदार उब्जे साजूक तूप आणि कोथिंबीर खोबरे किस घालून तयार .
नाश्ता नंबर २२. ‘उकडपेंडी‘ :गव्हाची कणिक कढईत कोरडी खमंग भाजून घेणे , बाजूला ठेवणे. कढईमध्ये पुरेश्या तेलाची फोडणी करून त्यात मोहरी हिंग जिरे , कढीपत्ता, दाणे , खोबरे ,ओवा , कांदा घालून परतणे . कांदा नीट परतल्यावर त्यात भाजलेली कणिक घालून परत थोडावेळ परतणे आणि त्यात गरम पाणी घालून नीट एकत्र करावे . मिश्रण नीट हलवून ३ ते ४ मिनिट नीट वाफ द्यावी . वाफ नीट दिल्यामुळे उकडपेंडी चिकट न राहता अथवा गोळे न होता छान मोकळी, मऊ आणि लुसलुशीत होते. अरे हो चवीसाठी मीठ ,किंचित साखर घाला नाहीतर सगळी मेहनत वाया जाणार . वरून पिळलेला लिंबू स्वाद वाढवणार हे निश्चित !
प्रतिक्रिया जरूर कळवा.

}

Diet Plans: 14 Day Free Trial Available, Book Now!

Personlized Wellness Leads
Sending

Comments on this entry are closed.