मधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये | - Just for Hearts

Contact No. - Pune : 020 27293337, 65273337 (10AM - 8PM) | Delhi : 0120 6447663 (10AM- 8PM)

मधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये |

Diabetes Management Diet Plan

*प्रमुख आहार सूत्र  – भाग 3*

मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र चरकाचार्यांनी वर्णन केले आहे.
आस्यासुखं स्वप्नसुखम्
दधिनी ग्राम्यौदकः पयांसि
नवान्नपानं गुडवैकृतंच
प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम !
हे सूत्र मधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये याविषयी माहिती सांगणारे आहे.
काय आश्चर्य किंवा एकरूपता आहे पहा. हे सर्व ऋषी एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी ‘काय करू नये’ ते पहिल्यांदा सांगताना दिसतात.
मनाचे श्लोक सांगताना समर्थ देखील असेच सांगतात,
“नको रे मना……..”
हे करू नको, ते करू नको. बाकी सगळं करं, पण हे हे एवढं अजिबात करू नकोस, पुढे धोका आहे.”
नकारार्थी गोष्टी आपल्या मनाला पटकन कळतात. हे वेडं मन सारखं तिथेच धाव घेतं. म्हणून अशा बेसावध क्षणांची आठवण सतत व्हायला हवी. कारण आयुष्यात एक क्षण भाळण्याचा आणि उरलेले सर्व सांभाळण्याचे! सावध तो सुखी म्हणून काय नको, ते प्रथम सांगितले जाते.
एकदा का मधुमेहाचे लेबल चिकटले की, आयुष्यभर गोड क्षण नुसते आठवणीतच ठेवायचे, अशी आजची धारणा. *आपल्याला ही धारणा बदलवायची आहे.* मनाची ताकद प्रचंड आहे. जर मनापासून ठरवले तर मधुमेह हद्दपार होऊ शकतो. अत्यंत कडू असणारा हा गोड विषय जरा वादग्रस्त आहे. पण उर्वरीत आयुष्य जर निरोगी आणि गोड जायला हवे असेल तर थोडे कडू निर्णय घेणे हितकर असते. हे निर्णय घ्यावेत.
मधुमेह होऊ नये याकरीता काय करू नये, या अवतरणातील इथली दुसरी ओळ प्रथम पाहू. कारण विषय दुधाचा सुरू आहे.
पय म्हणजे दूध आणि पय म्हणजे पाणी देखील. इथे शब्द वापरलाय “पयांसी”
हा ‘पाणी’ या अर्थी नक्कीच नाही. कारण त्याआधीच्याच शब्दामधे “उदक” असा वेगळा  शब्द ग्रंथकारांनी वापरला आहे. म्हणजे मधुमेहामधे पाणी आणि दूध या दोन्ही गोष्टीपासून सावध रहायला हवे, असे शास्त्रकारांना अपेक्षित आहे.
एखाद्या गोष्टीचा अभिमान जरूर असावा. पण गर्व असू नये.
आमची देशी गाय सर्वगुणसंपन्न जरूर आहे. हा अभिमान जरूर बाळगावा, पण तिचे दूध सर्व रोगात चालते, हा वृथा अहंकार मात्र नको. राजयक्ष्म्यासारख्या रोगात गाईच्या दुधापेक्षा शेळीचे दूध, शेळीचा सहवास श्रेष्ठ सांगितला आहे.
आमच्या देशी गाईबद्दल मला पूर्ण आदर आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आमच्या गाईचे दूधच औषधी ठरेल असे नाही.
काही ठिकाणी गोदुग्ध, काही वेळा गोदधी म्हणजे दही, काही ठिकाणी गोतक्र म्हणजे ताक,  काही ठिकाणी गो नवनीत म्हणजे लोणी,  काही ठिकाणी गोघृत म्हणजे तूप, तर काही ठिकाणी गोमूत्र, तर काही ठिकाणी गोमय म्हणजे शेण देखील औषध म्हणून काम करते.
मधुमेह होऊ नये, म्हणून दुध *घे -ऊ- च* नये असा टोकाचा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही. दूध आता लगेच बंदच करायला हवे असेही नक्कीच नाही.
*”पिण्याचेही”* काही नियम असतात ना.
गैरसमज नको, दुधाबद्दलच बोलतोय मी …….
वैद्य सुविनय दामले

 

Diet Plans: 14 Day Free Trial Available, Book Now!

Personlized Wellness Leads
Sending

Comments on this entry are closed.