चरक मीमांसा 2 - Just for Hearts

Contact No. - Pune : 020 27293337, 65273337 (10AM - 8PM) | Delhi : 0120 6447663 (10AM- 8PM)

चरक मीमांसा 2

Personalised Ayurveda Consultation with Dr.Prem \ Dr. Prem Shankar \ Ayurveda consultations \ Online consultations \ My eclinic \ Just for Hearts

शब्दार्थबोधासाठी नैयायिकांनी शक्ती आणि लक्षणा या शब्दवृत्ती वर्णन केल्या आहेत.
उत्तर मीमांसा दर्शनाने शब्दाच्या / ग्रंथाच्या तात्पर्यनिर्णयासाठी सहा हेतू दिले आहेत.

१. उपक्रम – उपसंहार ः ग्रंथ किंवा प्रकरणाच्या विषयाचे आरंभी केलेले प्रतिपादन म्हणजे उपक्रम. अंती केलेले प्रतिपादन म्हणजे उपसंहार. या उपक्रम उपसंहारामध्ये एकवाक्यता असते.
( याचे सोदाहरण स्पष्टीकरण केले जाईल.)

२. अभ्यास – जो विषय पुन्हा पुन्हा सांगितला जातो , ते तात्पर्य असते. जसे आयुष्याविषयी पुन्हा पुन्हा प्रतिपादन केले असल्याने आयुष्य हे आयुर्वेदाचे तात्पर्य आहे.

३. अपूर्वता – अन्य कोणत्याही प्रमाणाने न कळणारा, केवळ त्याच शास्त्राने कळणारा विषय म्हणजे अपूर्व. असा अपूर्व विषय त्या शास्त्राचे तात्पर्य असते.
जसे साधु ( योग्य ) शब्द केवळ व्याकरण शास्त्रावरूनच कळत असल्याने साधु शब्द हे व्याकरणाचे तात्पर्य आहे.

४. फल – शास्त्राचे अध्ययन करण्याने ज्याची प्राप्ती होते, ज्याच्या प्राप्तीसाठी शास्त्राची प्रवृत्ती असते, ते फल. ते तात्पर्य असते.
जसे आयुष्याच्या प्राप्तीसाठी आयुर्वेदशास्त्राची प्रवृत्ती असल्याने आयुष्य हे आयुर्वेदाचे तात्पर्य आहे.

५. अर्थवाद – निंदा किंवा स्तुती करणारी वाक्ये म्हणजे अर्थवाद. ज्याची निंदा केली असेल ते करू नये असे शास्त्राचे तात्पर्य असते, ज्याची स्तुती केली असेल ते करावे असे शास्त्राचे तात्पर्य असते.
उदाहरणार्थ – अष्टांग हृदय सूत्रस्थानात दिनचर्या अध्यायात कुठेही रोज स्नान करावे असा विधिमुखाने निर्देश नाही. परंतु स्नानाचे गुण सांगितले आहेत. त्यामुळे प्रतिदिन स्नान अभिप्रेत आहे असा निर्णय होतो.

६. उपपत्ती – अनेक दृष्टान्त देऊन विषय स्पष्ट केला जातो, असा विषय ग्रंथाचे तात्पर्य असते.

या साधनांच्या साहाय्याने योग्य अर्थनिर्णय करता येतो.

Diet Plans: 14 Day Free Trial Available, Book Now!

Personlized Wellness Leads
Sending

Comments on this entry are closed.