चरक मीमांसा - Just for Hearts

Contact No. - Pune : 020 27293337, 65273337 (10AM - 8PM) | Delhi : 0120 6447663 (10AM- 8PM)

चरक मीमांसा

Personalised Ayurveda Consultation with Dr.Prem \ Dr. Prem Shankar \ Ayurveda consultations \ Online consultations \ My eclinic \ Just for Hearts

ओम् नमो आत्रेयादिभ्यः आयुर्विद्यासंप्रदायकर्तृभ्यः नमो महद्भ्यः गुरुभ्यः ।

पारंपारिक पाठशाळांमध्ये अध्ययनापूर्वी विविध मंगलाचरणांचा पाठ केला जातो. त्यातील एक सोपे मंगलाचरण आयुर्वेदासाठी लिहिले आहे.

प्राचीन काळापासून वेदमंत्रांचे रक्षण उत्तम प्रकारे झाले आहे. तथापि त्यांच्या अर्थाविषयी संदेह उत्पन्न होऊ शकतो, म्हणून वेदांच्या अर्थाचा निर्णय करण्यासाठी मीमांसा दर्शन प्रवृत्त झाले.

आयुर्वेद हा उपवेद आहे. वेदांचे रक्षण जितके चांगले घडले तितके उपवेदांचे घडू शकले नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या संहिता त्रुटित खंडित स्वरूपात आपल्यापर्यंत पोचल्या. वेदांचे पठन होत आले तसे दर्शनांचेही पारंपारिकतेने पाठशालांमध्ये अध्ययन अध्यापन घडत राहिले. आयुर्वेदाचे पारंपारिक अध्ययन अध्यापनही लुप्त झाले. त्यामुळे संहितांच्या अर्थाचा निर्णय चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे.

मी अल्पमती अल्पज्ञानी आहे. उपवेदाची मीमांसा करण्याचा मला अधिकार नाही. छोटी नाव घेऊन समुद्र ओलांडायचा प्रयत्न करावा तसे हे साहस आहे. तथापि ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे, राजहंसाचे चालणे देखणे आहे म्हणून इतरांनी चालूच नये काय , या विचाराने मी हा प्रयत्न करण्यास प्रवृत्त झाले आहे.

आपणां सर्वांना विनम्र प्रार्थना आहे की या प्रयत्नात साथ द्यावी. चांगले ते उचलावे, चुकल्यास सुधारणा करावी. न्यून असेल ते पूर्ण करावे. तद्विद्य संधाय संभाषेने आपण निःसंदेह होण्याचा प्रयत्न करू.

वेदांच्या अर्थनिर्णयासाठी प्रवृृत्त झालेली शास्त्रे उपवेदाच्याही अर्थनिर्णयासाठी उपयुक्त ठरतील म्हणून चरक संहितेच्या अर्थनिर्णयासाठी न्याय, सांख्य, योग, मीमांसा यांचा विशेषतः उपयोग केला जाईल.

चरक संहितेच्या सूत्र, निदान, विमान, शारीर आणि चिकित्सा या स्थानांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहे.

आगमवर्जित काहीही होऊ नये याची काळजी घेईन.

इति शम् ।

Diet Plans: 14 Day Free Trial Available, Book Now!

Personlized Wellness Leads
Sending

Comments on this entry are closed.